Chanakya Niti : 'अशा' व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही; जर तुमच्यातही 'या' सवयी असतील तर आजच बदला, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही गोष्टींपासून दूर राहिलात तर तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करू शकतात असं चाणक्य सांगतात.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya) यांचे विचार आजही समाजात अनेकजण फॉलो करतात. ते एक महान अर्थशास्त्रज्ञ तसेच तत्वज्ञ होते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नीतीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीचं यश अपयश हे त्याच्या हातात असतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही गोष्टींपासून दूर राहिलात तर तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करू शकतात असं चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमत्तेत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला अपयशाच्या दिशेने घेऊन जातात. ज्या व्यक्तींमध्ये या सवयी असतात त्यांना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. या संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आळस
आचार्य चाणाक्य यांच्या मते आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. तसेच, आळशी व्यक्ती कधीच आपलं काम वेळेवर पूर्ण करत नाहीत. त्यामुळे यांना नेहमी अपयशाचा सामना करावा लागतो. तर, तेच ज्या व्यक्ती मेहनत आणि उत्साहाने काम करतात त्यांना आयुष्यात नेहमी यश मिळतं.
लोभ
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जी व्यक्ती लोभी असते त्यांना कधीना कधी आपल्या लोभामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा व्यक्ती आपला मान-सन्मान हरवून बसतात. आणि आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने कधीच लोभी असू नये.
बेईमान
चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसतात त्यांना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. असे लोक करिअरमध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. तसेच, अशा लोकांकडे नेहमीच पैशांची कमतरता असते. अनेकदा हे लोक आपल्या कर्मानेच आपला मान-सन्मान गमावून बसतात.
इतरांची निंदा करणे
चाणक्यांच्या म्हणण्यानुार, जी व्यक्ती इतरांची निंदा करतात ते नेहमी आयुष्यात इतरांपेक्षा पाठी राहतात. असे लोक फार कपटी स्वभावाचे असतात. अशा लोकांना इतरांचं सुख कधीच बघवत नाहीत. तसेच, नेहमी ते इतरांचं वाईट चिंतित करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: