(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanakya Niti: मन:शांती आणि सकारात्मक ऊर्जेच्या शोधात आहात? मग, चाणक्य नीतितील ‘या’ गोष्टी नक्की करा!
Chanakya Niti for motivation : माणसाला जीवनात यश मिळवायचे असेल, तर आयुष्यातील काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. यामध्ये त्यांनी मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जेचा उल्लेख केला आहे.
Chanakya Niti for motivation : चाणक्य नीतिचे शब्द एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. चाणक्यांना ‘आचार्य चाणक्य’ या नावानेही ओळखले जाते. चाणक्य हे त्यांच्या काळातील जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाशी संबंधित होते. या ठिकाणी आचार्य चाणक्य विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षण देत असत.
चाणक्यांबद्दल बोलताना असे म्हटले जाते की, त्यांना अर्थशास्त्र, राजकारण, कूटनीति आणि समाजशास्त्र इत्यादी विषयांचे खूप सखोल ज्ञान होते. चाणक्य यांना त्यांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून असे आढळून आले की, जर माणसाला जीवनात यश मिळवायचे असेल, तर आयुष्यातील काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. यामध्ये त्यांनी मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जेचा उल्लेख केला आहे. या दोन गोष्टी जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असतात, असे आचार्य चाणक्य म्हणतात.
मनःशांती : चाणक्य नीतिनुसार मनःशांती खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकत नाही. ज्या लोकांचे मन शांत असते, त्यांना जीवनात अपार यश मिळते. मनःशांती मिळवण्यासाठी चाणक्य नीतिनुसार उत्तम गुण अंगीकारले पाहिजेत. शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे, तरच मनःशांती मिळू शकते. कोणत्याही प्रकारचे दोष हे मनःशांतीमध्ये अडथळा आणणारे आहेत.
सकारात्मक ऊर्जा : चाणक्य नीति सांगते की, कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ऊर्जेला विशेष महत्त्व असते. माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक ऊर्जा. एखाद्या व्यक्तीला जीवनात मोठे यश मिळवून देण्यासाठी सकारात्मक ऊर्जा उपयुक्त ठरते. सकारात्मक ऊर्जा माणसाला अधिक कलात्मक बनवते. काम कोणत्या ना कोणत्या प्रकारे केले पाहिजे, याची प्रेरणा सकारात्मक ऊर्जेतून मिळते. सकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते. असे लोक प्रत्येक ध्येय सहज साध्य करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha