Cancer Monthly Horoscope : चिकाटीने संकटाचा सामना करा; जाणून घ्या कर्क राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना
Cancer Monthly Horoscope : कर्क राशीसाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा कालावधी कसा असेल हे जाणून घेऊया.
Cancer Monthly Horoscope : एप्रिल महिना हा कर्क राशीसाठी काही आव्हानं घेऊन येत आहे. पण या काळात निष्काळजीपणा दाखवला तर मात्र ते तुमच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. जास्त तणाव घेतला तर परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे. वर्तमानात जेवढं कष्ट घ्याल तितकं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. एप्रिल महिन्याच्या 16 तारखेनंतर जरा सावध राहा.
आर्थिक आघाडीवर काय असेल?
नोकरी करणाऱ्यांनी या काळात आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार रहावं. अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ जरा निराशाजनक आहे. उद्योगधंद्यामध्ये स्पर्धेला सामोरं जावं लागेल. ग्राहकांना अधिक ऑफर देऊन आकर्षित करावं लागेल. पण सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांनी या काळात उधारी देऊ नये. औषधांशी संबधित उद्योग करणाऱ्यांना या काळात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्याची काळजी घ्या
आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार केला असता जास्त काळजी करण्याचं कारण नाही. कमरेच्या खाली पायापर्यंत साधारण दुखणं असेल. दारुचे व्यसन असणाऱ्यांनी 17 तारखेनंतर जास्त सावधान रहावं, कारण त्यांना मोठ्या आजारांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. लहान मुलांना उष्ण गोष्टींपासून दूर ठेवावं. वीजेच्या संबंधित काम करताना अधिक खबरदारी घ्यावी, कारण करंट लागण्याची शक्यता आहे.
परिवार आणि समाज
तुमच्या बाजूने गोड बोला, त्यामुळे आजूबाजूंच्या लोकांशी संबंध चांगले राहिल. एप्रिलच्या शेवटचा 10 दिवसांचा कालावधी धार्मिक प्रवासासाठी शुभ आहे. महिन्याच्या मध्यापासून जोडीदाराशी संबंध चांगले ठेवण्यावर भर द्या. घरातील इंटेरिअर बदलायचं असेल तर हा महिना उत्तम असेल. संपत्तीचा वाद मिटवायचा असेल या महिन्याची संधी साधा, त्यामुळे नात्यातील संबंधही चांगले राहतील आणि आर्थिक लाभही मिळेल. या राशीच्या महिलांनी चैत्र नवरात्रीच्या दिवशी संध्या आरती करावी, त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांती नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)