Budhaditya Rajyog 2024: बुध ग्रह धनु राशीत होणार मार्गी; बुधादित्य राजयोगामुळे 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार, होणार धनलाभ
Budh Gochar 2024 : उद्या, म्हणजेच 7 जानेवारीला बुध ग्रह धनु राशीत मार्गी होणार आहे. बुधाचे हे संक्रमण धनु राशीत बुधादित्य राजयोग तयार करेल. हा राजयोग सर्व राशींची आर्थिक स्थिती मजबूत करेल.
Budhaditya Rajyog in January 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, राशी, योग आणि राजयोग यांना खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी (Zodiac Signs) बदलतो आणि जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो, त्याचा सर्व राशींवर थेट परिणाम होतो.
नुकताच नोव्हेंबरमध्ये बुध आणि सूर्याच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार झाला होता आणि आता जानेवारीत पुन्हा एकदा धनु राशीत बुध आणि सूर्य एकत्र येणार असल्याने बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार होत आहे. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे तयार होणारा योग खूपच खास असेल. अनेक राशींसाठी तो फायदेशीर ठरणार आहे. 7 जानेवारीला सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी बुध धनु राशीत मार्गक्रमण करेल, याचा कोणत्या 5 राशींना फायदा होणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
बुध ग्रहाच्या शुभ प्रभावाने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसू लागतील. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल आणि ज्यांनी नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला आहे, त्यांचे काम नीट रुळावर येईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळेल. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल आणि प्रत्येक कामात मनाप्रमाणे फळ मिळेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे धनलाभ होईल आणि व्यवसायात इच्छित यश मिळेल. विवाहित लोकांचे आपल्या जोडीदारासोबत संबंध दृढ होतील. तुमच्यासाठी हा काळ करिअरमध्ये विशेष यश देणारा मानला जातो आणि तुमच्या घरात आनंदाचा प्रवेश होईल. मिथुन राशीचे लोक आपल्या जोडीदारासाठी महागडे गिफ्ट देखील खरेदी करू शकतात.
सिंह रास (Leo)
बुध संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रात फायदा होईल आणि पैशाच्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. जे लोक स्टॉकवर्क करतात त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरेल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. बुध मार्गक्रमणाच्या प्रभावाने तुमचे ज्ञान वाढेल आणि आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. या दरम्यान विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध राशीचा स्वामी मानला जातो आणि बुधाच्या या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. या दरम्यान अवाजवी खर्च करू नका आणि भविष्यासाठी आपले पैसे वाचवा. या काळात तुम्हाला करिअरमध्ये इच्छित यश मिळेल आणि जे डॉक्टर किंवा वकील या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ यशाचा काळ ठरेल.
धनु रास (Sagittarius)
बुध मार्गक्रमणामुळे धनु राशीच्या उत्पन्नात वाढ होईल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात बुधाचे संक्रमण प्रेम-सुख वाढवते, असे मानले जाते. करिअरच्या बाबतीत या वेळी तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळू शकते. धनु राशीच्या लोकांना या वेळी अचानक पैसे मिळतील आणि तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shaniwar upay: शनीचा त्रास टाळण्यासाठी संध्याकाळनंतर करा 'हे' काम; सगळ्या अडचणी होतील दूर!