Budh Uday 2024 : धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
Budh Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, लवकरच तूळ राशीत बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब पालटू शकतं. नोकरी आणि व्यवसायात या लोकांना अभूतपूर्व यश मिळेल.
![Budh Uday 2024 : धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत Budh Uday 2024 in libra positive impact on these zodiac signs will get lucky unexpected money will come wealth health gets strong Budh Uday 2024 : धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/10/c97db13c462d19e8392b62533c0553951728549037878660_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Budh Uday 2024 : वैदिक शास्त्रांमध्ये बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. तसेच, बुध वाणी, व्यवसाय, शेअर बाजार आणि आर्थिक स्थितीसाठी जबाबदार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुधाच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा आर्थिक बाबतीत काही राशींना फटका बसतो, तर काही राशींना लाभ मिळतो. आता 23 ऑक्टोबरला बुध ग्रहाचा तूळ राशीत उदय होईल, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. या काळात 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळेल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
मेष रास (Aries)
बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक आयुष्य छान राहील. तसेच, या कालावधीत तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो आणि अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात. या काळात तुम्हाला व्यावसायिक भागीदारीचे फायदे मिळू शकतात. तर बुध ग्रह तुमच्या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचंही सहकार्य मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या पारगमन कुंडलीत उत्पन्न आणि लाभ स्थानात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकता. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यातून तुम्हाला अधिक पैसा मिळेल. या काळात तुमच्या मुलाचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल. नोकरीत लोकांना या काळात चांगल्या संधी मिळू शकतात, त्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये समाधानी दिसतील. यावेळी तुम्ही शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.
कर्क रास (Cancer)
बुधाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या चौथ्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला चैनीच्या वस्तू आणि सुविधा मिळतील. भौतिक सुखही मिळेल. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल आणि तुम्हाला स्वत:मध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. या काळात तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो. तसेच या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)