Budh Transit 2022 : 'या' सहा राशीच्या लोकांवर राहील बुधाची कृपा
Budh Transit 2022 : 25 एप्रिल 2022 रोजी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचा हा राशी बदल अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Budh Transit 2022 : एखादा ग्रह राशी बदलतो किंवा संक्रमण करतो तेव्हा त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतात. 9 ग्रहांपैकी एक ग्रह बुध हा धन, बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा कारक मानला जातो. 25 एप्रिल 2022 रोजी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचा हा राशी बदल अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मेष : या राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशीत बदल शुभ राहील. या काळात पैसा मिळू शकतो. अनपेक्षित मार्गाने उत्पन्न वाढू शकते. तुमच्या आवाजाच्या जोरावर तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार वकील, मीडिया, मार्केटिंग, शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. एवढेच नाही तर तुम्ही शत्रूंवर विजय मिळवू शकाल. प्रेम करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला जाणार आहे.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल. नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन घर किंवा घरात नूतनीकरणासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात कुटुंबात समृद्धी राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क : बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी धन मिळवून देऊ शकतो. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल आहे. व्यापार्यांना या काळात नफा होऊ शकतो. तुम्ही नवीन नोकरीचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे.
सिंह : ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरी आणि व्यवसायात नवीन ऑफर घेऊन येईल. नोकरीत बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यावसायिकांच्या व्यवसायाची वाढ होऊ शकतो. या काळात मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बघितले तर हा काळ एकूणच खूप छान असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)