एक्स्प्लोर
Astrology : कावळ्याची काव काव हाक देते 'हे' संकेत; जीवनाशी याचा नेमका संबंध काय? जाणून घ्या
Astrology : धार्मिक ग्रंथात कावळ्याला शनीचं वाहन म्हटलं जातं. तर, काही लोक कावळ्याला यम दूत देखील म्हणतात.
Astrology : ज्योतिषशास्त्रात, अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात, कावळ्याशी संबंधित सुद्धा शुभ आणि अशुभ परिणामांबद्दल सांगण्यात आलं आहे. कावळा हा असा पक्षी आहे जो काही परिस्थितींमध्ये शुभ तर काही परिस्थितींमध्ये अशुभ मानला जातो.
धार्मिक ग्रंथात कावळ्याला शनीचं वाहन म्हटलं जातं. तर, काही लोक कावळ्याला यम दूत देखील म्हणतात. पण, कावळ्याचे संकेत तुमचं नशीब कसं बदलू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या आयुष्यात सुख, प्रगती आणि आनंद कावळ्याच्या माध्यमातून कशी येते ते जाणून घेऊयात.
- ज्योतिषशास्त्रात, जर एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला कावळा पाणी पिताना दिसला तर तुमचं भाग्य उजळण्याचे हे संकेत आहेत. याचा अर्थ असा की, तुम्हाला लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती कावळ्याला अन्न देत असेल आणि कावळ्याने त्या व्यक्तीच्या समोरच अन्नग्रहण केलं तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होणार आहेत.
- ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर जात असेल आणि जर रस्त्यात कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज आला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते तुमचं काम पूर्ण होईल असा संकेत देताता.
- तसेच, जर एखाद्या मंदिरात तुम्हाला कावळा दिसला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. असं म्हणतात की, याचा अर्थ तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल असा याचा अर्थ होतो.
- ज्योतिष शास्त्रानुसार, जर कावळा तुमच्या खिडकीत पोळी किंवा काही अन्न घेऊन आला तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या घरातील एका व्यक्तीचं भाग्य लवकरच उजळणार आहे असा होतो. त्यांना धनलाभासह तुमची खूप प्रगती होईल असा याचा अर्थ होतो.
- शेवटचं म्हणजे, जर तुम्हाला सकाळ-सकाळ कावळ तुमच्या घराबाहेर दिसला तर याचा अर्थ तुमच्या मान-सन्मानात वाढ होणार आहे असा होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
काय सांगता! मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार,जाणून घ्या धनलाभाचे नेमकं कनेक्शन?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement