Astrology : आज शनि पुष्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृश्चिकसह 'या' 5 राशींचं होणार कौतुक, समाजात वाजणार डंका
Astrology Panchang Yog 31 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 31 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 31 मे 2025. म्हणजेच आज मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तसेच, आजचा वार शनिदेवालाही (Shani Dev) समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आज चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज वृद्धी योगासह पुष्य नक्षत्राचाही शुभ संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आजच्या शुभ राशींना शनिदेवाच्या कृपेने चांगला लाभ मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज शनिवार असल्या कारणाने तुम्हाला थोडा विकेंडचा आनंद घेता येईल. कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण नसेल. त्यामुळे मानसिक शांती मिळेल. आज तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा तुम्हाला पूर्ण करता येईल. तसेच, तुम्हाला वाहन चालवण्याचा आनंद घेता येईल. वैवाहिक जीवन देखील पूर्वीपेक्षा जास्त चांगले सुरळीत चालेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार उत्साही असणार आहे. आज तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल. तसेच, संध्याकाळच्या वेळी तुमचं मन धार्मिक कार्यात रमेल. तुमच्या कामाचं कौतुक देखील केलं जाईल. हा क्षण तुमच्यासाठी फार सुंदर असेल. आज मिडिया, शिक्षण आणि कोचिंग क्लासेसशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला पार्टनरकडून छान भेटवस्तू मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या कामकाजात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तुमच्या मनावर तुमचा ताबा असेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा तुम्ही पूरेपूर प्रयत्न कराल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तुमच्या मनातील इखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुलं सुट्टीचा चांगला आनंद घेतील. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना आज चांगला लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. जोडीदाराबरोबर तुमचं आयुष्य सुखात जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















