Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 'या' 5 राशी ठरतील भाग्यशाली, चालून येणार मोठी संधी
Astrology Panchang Yog 21 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Pnachang Yog 21 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 21 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार गुरुवार असल्या कारणाने हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज गुरु पुष्य योगासह सर्वार्थ सिद्धी योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आजच्या शुभ राशींना चांगला लाभ मिळेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तुमच्या मनासारखं तुम्हाला काम करता येईल. तसेच, कामाशी संबंधित तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. समाजातील काही प्रतिष्ठीत लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, मुलांच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसून येईल. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. संपत्तीत भरभराट होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणतं नुकसान होणार नाही. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















