Astrology : आज सौभाग्य योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींना धनलाभाच्या संधी, तिजोरी होणार फुल्ल
Panchang 8 May 2024 : मे महिन्याचा आठवा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींना आज आर्थिक लाभ होईल आणि त्यांच्या धनसंपत्तीत वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 8 May 2024 : ग्रहांची स्थिती पाहता, आज 8 मेचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, बुधवार, 8 मे रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत प्रवेश करणा आहे. तसेच आज चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2024) असून या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चैत्र अमावस्येच्या दिवशी 5 राशींना शुभ योगाचा लाभ मिळणार आहे. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच 8 मे चा दिवस लाभदायक आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज बाप्पाच्या कृपेने त्यांच्या प्रत्येक कामात भरपूर यश मिळेल आणि त्यांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमच्या आवडीच्या छंदात आजचा दिवस खर्च झाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचं मनही प्रसन्न राहील. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता असून त्यांना अधिकाऱ्यांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. आज तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल. आज केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ दिवस असणार आहे. नोकरदार लोक आज पूर्ण मेहनत आणि समर्पणाने काम करतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, आज तुम्हाला एखादी मोठी डील मिळू शकते. तुम्हाला प्रिय व्यक्ती आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि धार्मिक कार्यात रस वाढेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संभाषणातून सोडवला जाईल आणि नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. तूळ राशीचे नोकरदार लोक आज नवीन योजनांवर काम करू शकतात. आज तुम्हाला काही धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळेल आणि त्यांच्या मेहनतीला पूर्ण यश मिळेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुमचा सन्मान वाढेल. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुमच्यासाठी पैसे कमवण्याचे मार्गही मोकळे होतील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, कुटुंबात सुख-शांती आणि समृद्धी नांदेल आणि मुलांचा विकास पाहून मन प्रसन्न राहील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरू शकतो. धनु राशीच्या लोकांना आज त्यांची क्षमता दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि त्यांचे अडकलेले पैसेही परत मिळतील. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि तुम्ही इतरत्रही गुंतवणूक करू शकता. नोकरदार लोकांना आज अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. आज व्यावसायिकांना फायदा होण्याची शक्यता आहे आणि ते आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करू शकतात. आज श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. अविवाहित लोक आज एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात, जो त्यांचं मन आनंदी करेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, परस्पर विश्वास राहील आणि आज आपण एकमेकांना समजून घेऊन काम करू शकता.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. आज तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. नवीन नोकरीत रुजू झालेल्यांना आज शुभ परिणाम पाहायला मिळतील, आज सहकारी तुम्हाला मदत करताना दिसतील. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, आज घरी पाहुणे येऊ शकतात. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल, आज तुम्हाला खूप नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Chaitra Amavasya 2024 Date : आज चैत्र अमावस्या; अचूक तिथी, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या