Chaitra Amavasya 2024 Date : आज चैत्र अमावस्या; अचूक तिथी, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या
Chaitra Amavasya 2024 Date : चैत्र अमावस्येसोबत चैत्र महिना देखील समाप्त होईल. पितरांच्या शांतिसाठी हा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. परंतु, ही चैत्र अमावस्या नेमकी सुरू कधी होणार? जाणून घ्या
Chaitra Amavasya 2024 Date : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावास्येला चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2024) म्हणतात. हिंदू धर्मात या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि अनेक धार्मिक कार्य केली जातात. यंदा ही चैत्र अमावस्या बुधवारी, 8 मे रोजी आहे. पण ही अमावस्या नेमकी सुरू कधी होणार आणि संपणार कधी? जाणून घेऊया.
चैत्र अमावस्या 2024 तिथी (Chaitra Amavasya 2024 Tithi)
अमावस्या प्रारंभ : 7 मे रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटे
अमावस्या समाप्ती : 8 मे रोजी सकाळी 8 वाजून 51 मिनिटे
चैत्र अमावस्या तिथी 7 मे रोजी सुरु होत असली तरी ती 8 मे रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात उदयतिथीला महत्त्व आहे आणि त्यामुळेच उदयतिथीनुसार, यंदा चैत्र अमावस्या बुधवारी 8 मे रोजी साजरी केली जाईल.
चैत्र अमावस्या महत्त्व (Chaitra Amavasya 2024 Significance)
राहू-केतू किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांचा मोक्ष तर होतोच, पण पितृदोषही दूर होतो. या दिवशी केलेले काही उपाय कालसर्प दोषापासूनही मुक्ती देतात.
चैत्र अमावस्येला करा ही शुभ कामं
उपवास करा
चैत्र अमावस्येला उपवास करावा. यामुळे अध्यात्मिक शिस्त लागते. आत्म-नियंत्रण राहते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.
दानधर्म करा
चैत्र अमावस्येच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता. या शुभ दिवशी उदारता आणि निःस्वार्थता दाखवणं शुभ मानलं जातं. पितृदोष निवारणासाठी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावं.
घरातील वातावरण पवित्र ठेवा
या दिवशी तुमचं मन शांत ठेवा. तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या. नको त्या विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा. दिवाबत्ती, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवा.
पाण्यात तीळ टाकून अंघोळ करा
चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. या अमावास्येला पाण्यात तीळ टाकून अंघोळ केल्याने शनिदोष दूर होतात. या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने ग्रह दोष दूर होतात.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा
अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करावं, यामुळे पितरांना मुक्ती मिळते. तसेच चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व रोग दूर होतात.
अध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा
मंत्रजप आणि इतर आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. यामुळे पितरांना मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :