एक्स्प्लोर

Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर आज जुळून आला गजलक्ष्मी राजयोग; सिंहसह 'या' 5 राशींचे अच्छे दिन सुरू, धनप्राप्तीसह मिळणार लाभाच्या संधी

Panchang 30 May 2024 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी, राजयोगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज लक्ष्मीची कृपा राहील, त्यांच्याकडे धनलाभाच्या संधी धावून येतील. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 30 May 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, गुरुवार, 30 मे रोजी वृषभ राशीमध्ये गुरु आणि शुक्राचा संयोग होत आहे, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे. तसेच आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करत आहे, जिथे शनिदेव आधीच विराजमान आहेत. त्याच सोबत आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी गजलक्ष्मी राजयोगासह षष्ठ योग, मालव्य योग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांमध्ये आज प्रचंड आत्मविश्वास दिसून येईल. जर तुमच्या व्यवसायात काही अडचण येत असेल तर ती आज दूर होईल आणि तुमच्या व्यवसायाच्या योजनांना चालना मिळेल, जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते आज परत करू शकाल आणि दिलेलं वचन पूर्ण कराल. नोकरदार लोकांचा दिवस चांगला असेल, आज त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, भाऊ-बहिणींचे प्रेम आणि सहकार्य मिळेल आणि वडिलांच्या मदतीने अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. अविवाहित लोक आज कोणी खास व्यक्तीला भेटू शकतात.

सिंह रास (Leo)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या बोलण्यात आज गोडवा राहील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होईल, त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत चांगली वाढ होईल आणि नवीन मित्रही बनतील. आज व्यावसायिक प्रगतीसाठी नवनवीन रणनीती बनवताना दिसतील आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही चांगली स्पर्धा देऊ शकतील. नोकरदार लोक आज आपलं काम शीर्षस्थानी नेण्यासाठी काम करतील, ज्यामुळे सर्वजण प्रभावित होतील आणि करिअरच्या क्षेत्रात पुढे जातील. आज तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून चांगली बातमी ऐकू येईल आणि एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलल्यास, तुमच्या जोडीदाराशी परस्पर संबंध चांगले होतील आणि तुम्ही एकत्र काही मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. तूळ राशीचे लोक आज आपल्या कामाने समाजात एक वेगळं स्थान निर्माण करतील. आज तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी येत होत्या त्या विष्णूच्या कृपेने दूर होतील. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि सर्व कामं हुशारीने पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळेल. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते दूर होतील आणि तुम्हाला एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही दोघेही कुटुंबाच्या भल्यासाठी काही नवीन पावलं उचलाल.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज वृश्चिक राशीचे लोक स्वतःच्या तसेच संपूर्ण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतील आणि धार्मिक कार्यातही उत्साहाने सहभागी होतील. आज तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय अनेक माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल आणि चांगली बचतही करू शकाल. आज व्यावसायिकांना यश मिळेल आणि जास्त नफा मिळवण्यातही ते यशस्वी होतील. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, नात्यात प्रेम आणि सुसंवाद असेल आणि तुम्ही एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावना एकमेकांसमोर सहज व्यक्त करू शकाल. नोकरदारांची पगारवाढीची प्रतीक्षा संपेल. आज तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि तुमच्या भावांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि परदेश दौऱ्यावर जाण्याची संधीही मिळेल. आज तुमच्यात दडलेली कला लोकांसमोर येऊ शकेल. धार्मिक आणि सामाजिक कार्य करून तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतील. भगवान विष्णूच्या कृपेने मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण सोडवलं जाऊ शकतं. तुमच्या जोडीदाराचा सल्ला व्यवसायात उपयुक्त ठरेल आणि दोघांमध्ये प्रेम राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 30 May 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहितीABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget