एक्स्प्लोर

Astrology : आज गौरी योगासह बनले अनेक शुभ योग; तुळसह 5 राशींना होणार डबल लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण

Panchang 25 October 2024 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी गौरी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 25 October 2024 : आज शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी दिवसभर चंद्र कर्क राशीत राहणार आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी असून या दिवशी शुभ योग, गौरी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी असणार आहे. आज, देवी लक्ष्मीच्या कृपेने मेष राशीच्या लोकांची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतील आणि तुम्हाला काही नवीन मित्र मिळतील, जे गरजेच्या वेळी तुम्हाला साथ देण्यासाठी उभे असतील. जर तुम्हाला गुंतवणुक करायची असेल तर तुम्ही आज करू शकता, तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल. दुकानदारांना आज चांगला नफा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे आज दिवाळीच्या सुट्टीसाठी अधिकाऱ्यांशी बोलणी करू शकतात. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर आज सर्व गैरसमज दूर होतील. 

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. कन्या राशीचे लोक आज त्यांच्या इच्छा सहज पूर्ण करू शकतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांना कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना आज एखाद्या मित्रामार्फत नवीन नोकरीबद्दल माहिती मिळेल, जिथे तुम्ही अर्ज करू शकता. आज तुम्ही कुटुंबासाठी नवीन घर खरेदी करू शकता किंवा जुन्या घराची दुरुस्ती करण्याचा निर्णय तुमच्या कुटुंबियांसोबत घेऊ शकता, असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावरील विश्वास दृढ होईल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाने साथ दिल्यास पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळतील. पैशामुळे जी काही कामे रखडली होती ती आज पूर्ण होतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर आज तुमचे आरोग्यही सुधारेल. व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्यांवर आज देवी लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या स्थितीतही असेल. आज जे काही काम कराल ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता आणि जमीन खरेदी करण्याची संधी मिळेल.

मकर रास (Capricorn)

आज मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. मकर राशीचे लोक कोणताही निर्णय अत्यंत शहाणपणाने घेतील. अविवाहित लोक आज त्यांच्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकतात. वैवाहिक जीवनात असलेल्यांची त्यांच्या जोडीदारासोबत आज चांगली जमेल. आज देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने, तुमच्या कामात सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्ही अधिक सर्जनशील राहून व्यवसाय सुधारण्बायाबत मोठे निर्णय घेऊ शकता. आज एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. संध्याकाळ एखाद्या धार्मिक ठिकाणी घालवाल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मीन राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि तुमच्यातील सकारात्मक उर्जेमुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील. गुंतवणुकीसाठी तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल कारण. अविवाहित लोकांना आज चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. तसेच, जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवाल, त्यामुळे तुमच्या नात्यात आनंद राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 25 October 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणारAnant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget