(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज जुळून आला गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग, वृश्चिकसह 'या' 5 राशींची लागणार लॉटरी; पदोपदी मिळतील शुभ संकेत
Astrology Panchang 24 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना (Zodiac Signs) होणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astrology Panchang 24 October 2024 : आज 24 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस हा फार खास आहे. आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. तसेच, आज गुरु पुष्य योग (Yog), साध्य योग आणि पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना (Zodiac Signs) होणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. भगवान विष्णुची आज तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असणार आहे. तसेच, आज विद्यार्थ्यांची एकाग्रता दिसून येईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज धन प्राप्तीचे चांगले योग जुळून येणार आहेत. ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तसेच, व्यावसायिकांना आज कामात चांगला नफा मिळेल. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. त्यामुळे आज दिवसभर तुम्ही खूप उत्साही असाल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही अगदी सकारात्मक असाल. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं असल्यास आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल. मात्र, आज कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमचं मन नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त रमेल आणि तुम्ही त्यानुसार प्लॅन कराल. तसेच, विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :