एक्स्प्लोर

Horoscope Today 24 October 2024 : आज गुरुवारचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार भाग्याचा? जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 24 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

आजचा दिवस चांगला जाईल. आज ऑफिसमध्ये बढाई मारणं, दुसऱ्याला ज्ञान देणं बंद करा, अशाने लोक तुम्हाला अहंकारी समजतील, म्हणून तुम्ही थोडे सावध राहा. व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध राहावं. आज तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल. आज काहीही साध्य करण्यासाठी परिश्रम हाच एक मार्ग आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप यश मिळवू शकता. आज गाडी चालवताना थोडं जपून राहा, अपघात होऊ शकतो, दुखापत होऊ शकते.  

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरदारांनी काम जबाबदारीने काम करावं. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं. व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल, कारण तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागू शकतो. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर नातं थोडं तणावाचं असू शकतं. तुम्ही तुमच्या प्रियकराशी उद्धट बोलू नका, तरच नातं नीट चालेल. मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

आजचा दिवस खूप खर्चाचा असेल. आज तुम्ही नको त्या कामात तुमचा वेळ घालवू शकता. गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे खूप अस्वस्थ होऊ शकता. आज आर्थिक बाबतीत दिवस चांगला असेल, व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असेल. आज तुमची चांगली कमाई होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. जरी रागाच्या भरात काही बोलला तर नंतर माफी मागा. आज लहान मुलांना जास्त त्रास देऊ नका. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. 

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो, तुम्ही ते काम पूर्ण झोकून देऊन करू शकता. व्यापारी वर्गाने आधीच्या चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा, त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

आजचा दिवस लाभाचा असेल, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. आज व्यावसायिकांनी सरकारी नियमांचं उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते. आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल. तुम्ही ते काम वेळेत पूर्ण कराल. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. सकस आहार घेतला पाहिजे. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणारे आज कामाचा योग्य प्लॅन बनवतील आणि त्यानुसार काम करतील, तर तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. तर तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. तरुणांनी आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी हुशार लोकांचं ऐकलं पाहिजे आणि ते काय म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमची तुमच्या पार्टनरबरोबर भेट झाल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. जर तुम्ही तुमच्या कामात परिवर्तन केलं तर पुढे ते तुमच्यासाठीच चांगलं असणार आहे. तसेच, आज तुम्ही कोणाशीही बोलताना विचारपूर्वक बातचीत करा. नवीन काम करण्यासाठी तुमची आवड जागृत होईल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. तसेच, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आज तुमच्या सर्व चिंता दूर होतील. तसेच, जोडीदाराला तुम्ही एखादी छानशी भेटवस्तू गिफ्ट म्हणून द्याल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. तुमचं आज कामाच्या ठिकाणी मन नाही लागणार. तसेच, कुटुंबातही तणावाचं वातावरण असेल. आज घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी संयम सोडू नका. धैर्यशील राहा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसून येईल. कारण बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आज तुम्ही कोणत्याही कामात निष्काळजीपणा केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचं बोलणं तुम्हाला ऐकावं लागू शकतं. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscoep)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात शुभ कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच ाबहेर पडा. तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. तसेच, आरोग्य चांगले राहील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. गुरुवार असल्यामुळे दत्तगुरुंचा वार आहे. मात्र, तुमच्यासाठी आजचा दिवस काहीसा खास नसणार आहे. तणावपूर्वक आणि धावपळीचा आजचा दिवस जाईल. तसेच, तुमच्या आरोग्याबाबत बोलायचं झाल्यास, तुम्ही बाहेरचं तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळावं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 24 October 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Embed widget