एक्स्प्लोर

Astrology : आज अमृत सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींना डबल लाभ, महादेवाच्या कृपेने होणार भरभरुन धनवृष्टी

Panchang 21 October 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी अमृत सिध्दी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 21 October 2024 : आज सोमवार, 21 ऑक्टोबर रोजी चंद्र मिथुन राशीत जाणार आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांची जी काही स्वप्नं असतील, ती आज तुम्हाला पूर्ण होताना दिसतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल आणि मानसिक शांतीही मिळेल. तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात असलेल्यांना आज त्यांच्या जोडीदाराकडून चांगली भेट मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम आणखी घट्ट होईल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या बॉसचं सहकार्य मिळेल आणि ते  तुमची प्रशंसाही करतील. त्याचबरोबर आज सणासुदीच्या काळामुळे व्यावसायिक चांगला नफा कमावतील. जर कुटुंबात काही वाद चालू असतील तर ते आज संपतील.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कर्क राशीचे लोक शंकराच्या कृपेने सुखात राहतील. आज तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकाल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना आज भावांच्या सल्ल्याचा आणि सहकार्याचा चांगला फायदा होईल. त्याचबरोबर सणासुदीच्या वस्तूंसाठी दुकानदारांकडे गर्दी होणार असल्याने त्यांना चांगला नफा मिळणार आहे. या राशीचे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतील. सासरच्या कोणाशी वाद चालू असेल तर आज सर्व ठिक होईल.

तूळ (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही तयार असाल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आज प्रभावशाली लोकांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा संवाद आज चांगला राहील आणि तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये एकत्र गुंतवणूक देखील करू शकता. आज कुटुंबात आनंद आणि शांती असेल. 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि ते स्वतःसाठी ऑनलाईन शॉपिंग देखील करू शकतात. दिवाळीच्या निमित्ताने घराची साफसफाईची कामं पूर्ण होतील आणि घरातील सदस्यांसह सजावटीसाठी खरेदीला देखील जाऊ शकता. आज तुमचं आरोग्य चांगलं असेल मिळेल. जर लव्ह लाइफमध्ये असलेल्यांनी अद्याप त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पार्टनरबद्दल माहिती दिली नसेल, तर तुम्ही त्यांना आज कळवू शकता आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल.

मीन (Pisces Today Horoscope)

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. मीन राशीच्या लोकांमध्ये आज नवीन ऊर्जा दिसेल. तुम्ही दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण कराल. आज तुम्हाला प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. नशिबाच्या पाठिंब्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असेल, भविष्यात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना आज चांगली बातमी मिळू शकते, ज्याचा ते भविष्यात पुरेपूर फायदा घेऊ शकतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 21 October 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरेUddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Embed widget