Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; धनुसह 5 राशींना लाभच लाभ, सूर्यदेवाच्या कृपेने अचानक होणार पैशाची आवक
Panchang 20 October 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी गजकेसरी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 20 October 2024 : आज रविवार, 20 ऑक्टोबर रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे, ज्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला संकष्ट चतुर्थी पकडली जाते. आजच्या दिवशी गजकेसरी योगासह व्यतिपात योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा आनंदाचा असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज दैनंदिन कामं सहजपणे पूर्ण करू शकतील. आज धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल, जे तुमच्यासाठी सकारात्मक असेल. आज तुम्हाला तुमच्या वडिलांसोबत काही नातेवाईकांच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल, जिथे तुम्हाला अनेक प्रिय व्यक्ती भेटतील. आज व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. आज करवा चौथच्या मुहूर्तावर व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा होईल आणि सणानिमित्त चांगली खरेदी होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट होईल.
कन्या (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कन्या राशीचे लोक आज स्वतःच्या फायद्यासाठी काही विशेष निर्णय घेऊ शकतील. आज पती-पत्नी मिळून सोनं, भांडी किंवा संसारोपयोगी वस्तू खरेदी करतील आणि दोघांमधील नातं अधिक घट्ट होईल. आज तुमचा उत्साह खूप असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला महत्वाच्या कामात सहकार्य कराल. आज सणामुळे तुम्ही व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर टफ देऊ शकाल. आज तुम्ही घरगुती वस्तूंवर उदारपणे पैसे खर्च कराल, परंतु भविष्यासाठी तुम्हाला काही बचत देखील करावी लागेल हे लक्षात ठेवा. कुटुंबात काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील, ज्यामुळे तुम्हाला सुख-शांतीचा अनुभव येईल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. धनु राशीचे लोक आज जे काही काम करतील त्यात यश मिळवतील. प्रेम जीवनातील लोकांना आज अधिक प्रेम लाभेल. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा किंवा परीक्षेतून त्यांची हुशारी लोकांना दाखवण्याची संधी मिळेल. या राशीचे व्यापारी आज सणानिमित्त खूप व्यस्त असणार आहेत, त्यांच्या व्यावसायिक धोरणामुळे त्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळू शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अनुकूल नातेसंबंध टिकवून ठेवाल.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज रविवारच्या सुट्टीमुळे अनेक घरगुती कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या भेडसावत असेल तर ती आज दुपारी कमी होईल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. आज घर दुरुस्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी दिवस चांगला जाईल. आज तुम्ही व्यवसायात अधिक बुद्धी वापराल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगलं यश मिळेल. तुम्हाला मालमत्ता आणि वाहन खरेदी करायचं असल्यास, तुम्हाला आज चांगली ऑफर मिळू शकते.पती-पत्नी एकमेकांसाठी उपवास ठेवू शकतात.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज कोणतंही काम करतील, ते संयमाने करतील, त्यामुळे त्यांची अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल तर तुम्ही तो सहज घेऊ शकाल. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला आज भावांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर तो आज परत येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालवाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 20 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य