Horoscope Today 20 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 20 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 20 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही सुट्टीची मज्जा घ्याल. ज्यांना कामावर जायचंय त्यांच्यावर देखील कामाचा जास्त ताण नसेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, आज रविवारमुळे तुम्ही नफ्यात असाल.
विद्यार्थी (Student) - तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील. आज मित्रांसोबत वेळ घालवाल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला अंगदुखीचा त्रास जाणवू शकतो.
वृषभ (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज सुट्टी असली तरी तुम्हाला कामाचा ताण जाणवेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल. ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळेल.
विद्यार्थी (Student) - आज मौजमजेसोबत थोडा वेळ अभ्यासाठी दिला पाहिजे, तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य ठणठणीत राहील.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही केलेल्या कामाची तुम्हाला पोचपावती मिळेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यावसायिकांना देखील आज चांगला नफा मिळू शकतो.
विद्यार्थी (Student) - आज तुमच्या घरातील वातावरण चांगलं असेल, जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवाल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज जास्त धावपळ करू नका, दिवसाच्या शेवटी थकवा जाणवू शकतो.
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला आज बोनसबद्दल किंवा एखादी चांगली बातमी मिळेल.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, सणासुदीचा काळ असल्याने उत्पादनांची चांगली विक्री होईल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, परीक्षेच्या तोंडावर तुम्ही आज चांगला अभ्यास कराल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्हाला तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्हाला काही समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. सुट्टीच्या दिवशी घरुन काम करावं लागू शकतं.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी काम करताना त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या सेवेचा फीडबॅक घेतला पाहिजे आणि पुढे त्यानुसार बदल केले पाहिजे.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी नको त्या गोष्टीत आपला वेळ घालवू नये.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करू शकता.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरदार वर्ग आज खरेदीमध्ये रममाण होईल आणि आजचा दिवस खर्चिक असेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी आज जपून राहावं, तुमची फसवणूक होऊ शकते.
विद्यार्थी (Student) - तरुणांचा दिवस घरात एखाद्या कामात मदत करण्यात जाईल. कितीही अभ्यास असेल तरी काम करावंच लागेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.
तूळ रास (Libra Horoscope Today)
नोकरी (Job) - जे लोक मार्केटिंग क्षेत्रात काम करतायत त्यांना आज चांगला नफा मिळेल. तुमच्या कामावर बॉसदेखील खुश असेल.
व्यवसाय (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही देखील खुश असाल.
युवक (Youth) - तुमच्या आसपास असलेल्या मुक्या प्राण्याची, पक्ष्याची सेवा केल्यास तुम्हाला त्यातून चांगलं पुण्य मिळू शकतं.
आरोग्य (Health) - आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा. कारण हा तणाव तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही कमजोर बनवेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी (Job) - जर तुमचं ऑनलाईन का असेल तर तुमचा डेटा योग्यरित्या सांभाळून ठेवा. अन्यथा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला ओरडा मिळू शकतो.
व्यवसाय (Business) - आज कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रं नीट वाचून घ्या. मगच सही करा.
कुटुंब (Family) - आज कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी नीट संवाद साधा. उद्धट बोलू नका. अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
आरोग्य (Health) - जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या. अन्यथा तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परदेशातून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते.
व्यवसाय (Business) - आज व्यवसायिकाने सरकारी टॅक्स भरण्याच्या कामात अजिबात दिरंगाई करू नये. अन्यथा तुम्हाला ती महागात पडू शकते.
युवक (Youth) - तरूणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा. तरच तुम्हाला भविष्यात यश मिळू शकतं.
आरोग्य (Health) - आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल. यासाठी वेळेवर विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - जे लोक पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. ऑपरेशन करताना काळजी घ्या.
आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका. आणि थंड पाणी पिऊ नका.
व्यवसाय (Business) - जे छोटे व्यावहारिक आहेत त्यांना आज व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे काम करायला देखील उत्साह येईल.
विद्यार्थी (Students) - आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन थोडे गंभीर असाल. कारण वाढत्या स्पर्धेमुळे तुम्हाला तणाव होऊ शकतो.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा.
व्यवसाय (Business) - ज्या ठिकाणी कोर्ट कचेरी असतील अशा व्यवसायात अडकू नका,नंतर प्रकरण तुमच्या गळ्याशी येऊ शकतं.
युवक (Youth) - आज तरूणांनी प्रेमसंबंध सोडून इतर बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त तणावाचा सामना करावा लागेल. अनेक दिवसांपासून तुमचं रखडलेलं काम आजही पूर्ण होईल की नाही यात शंकाच आहे.
आरोग्य (Health) - जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते.
व्यवसाय (Business) - व्यवसायात तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडाफार बदल करणं गरजेचं आहे.
युवक (Youth) - आज तुमचा आत्मसन्मान दुखावू शकतो. त्यामुळे इतरांचं बोलणं मनावर घेऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: