(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology Panchang 17 September 2024 : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुळून आला चंद्र मंगळ नवम पंचम योग; 5 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा
Astrology Panchang 17 September 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम पाच राशीच्या लोकांना होणार आहे.
Astrology Panchang 17 September 2024 : आज 17 सप्टेंबर मंगळवारचा दिवस हा अनेक अर्थाने खास ठरणार आहे. आज अनंत चतुर्दशीचा (Anant Chaturdashi) दिवस असल्याने 10 दिवस विराजमान असलेले बाप्पा आज निरोप घेणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असल्या कारणाने हा दिवस महत्त्वाचा आहे. आज जुळून आलेल्या शुभ योगामुळे (Yog) रवि योग, धृतिमान योग आणि शतभिषा नक्षत्र यांसारखे शुभ योग जुळून आले आहेत त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम पाच राशीच्या लोकांना होणार आहे. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासमोर उपलब्ध होतील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या करिअर संदर्भात काही शुभ बातम्या ऐकू येतील. तुमच्या कुटुंबातील वातावरण आज धार्मिक असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या आज पूर्ण होण्याची शक्यता असणार आहे. देवाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर असेल त्यामुळे कोणत्याच प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभाचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ चांगली असेल. तुमच्या कामाचं प्रदर्शन चांगलं असल्या कारणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती जाणवेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान चांगला वाढेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामाची प्रशंसा केली जाईल. त्यामुळे तुम्हाला फार उत्साही वाटेल. व्यापारी वर्गातील लोक कामानिमित्त वेगवेगळ्या योजना आखण्यात यशस्वी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: