Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना होणार बक्कळ धनलाभ, करा 'हे' अचूक उपाय
Panchang 16 May 2024 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींना आज आर्थिक लाभ होईल आणि त्यांच्याकडे विविध स्रोतांतून पैसा येईल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 16 May 2024 : आज, गुरुवारी, 16 मे रोजी चंद्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी असून या तिथीला सीता नवमी साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी सीतेचं दर्शन झालं. सीता नवमीच्या दिवशी रवियोग, ध्रुव योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मेष, सिंह आणि मकर राशीसह 5 राशींना (Zodiac Signs) सीता नवमीच्या दिवशी शुभ योगाचा फायदा होईल.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी मान-प्रतिष्ठा वाढवणारा असेल. मेष राशीचे लोक आज आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, तुम्हाला परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल तर तुम्ही घरातील व्यक्तींशी तुमचे विचार शेअर करू शकता. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला काही नवीन संपत्ती मिळेल असं दिसतं, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. या राशीचे नोकरदार आज व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकतात. आज तुम्ही तुमचे खर्च चांगल्या प्रकारे हाताळाल.
उपाय : आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीला हळद लावलेली पाच फुलं अर्पण करा आणि देवीची पूजा करा. यानंतर लाल कपड्यात ही फुलं बांधून तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचं मन आनंदी असेल. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचारही कराल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील. गरज पडल्यास तुम्हाला कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळू शकतं. अविवाहित लोक एखाद्या कार्यक्रमात एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात आणि त्यांच्यासोबत बोलणं पुढे नेण्याची संधी देखील तुम्ही शोधाल. कुटुंबाच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होतील.
उपाय : धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाचं पान गंगाजलाने धुवा आणि 'ओम श्रीं ह्रीं श्रीं नमः' हा मंत्र सिंदूराने लिहून पर्समध्ये ठेवा. तसेच लक्ष्मीची प्रतिमा कोरलेलं चांदीचं नाणं पाकिटात ठेवा.
कन्या (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज अनपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल.विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील आणि त्यांचं अभ्यासावर लक्ष लागेल. भागीदारीत व्यवसाय करण्यात तुम्ही रस दाखवाल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे चांगले संबंध राहतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आज दूर होतील, ज्यामुळे तुम्ही दोघे एकमेकांचं ऐकाल आणि एकमेकांना समजून घ्याल. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आघाडीवर असाल. तुमचे मित्र तुम्हाला सर्व कामात मदत करतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.
उपाय : तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी एक नाणं आणि 7 हळकूंड पिवळ्या कपड्यात बांधून मंदिरात दर्शन घ्या.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांची आज अध्यात्मात रुची वाढेल. विद्यार्थी आज चांगला अभ्यास करतील. कौटुंबिक वातावरण चांगलं असेल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत तुमचा दिवस उत्तम जाईल, तुम्ही काल केलेल्या कामामुळे बॉस तुमचं आज कौतुक करेल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत उत्स्फूर्तता असेल, ज्यामुळे बरेच लोक तुमच्यावर प्रभावित होतील. जर तुम्हाला पैशाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती मित्राच्या मदतीने सोडवली जाईल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत जेवायला बाहेर देखील जाऊ शकता.
उपाय : व्यावसायिक प्रगतीसाठी गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवा आणि कामाच्या ठिकाणी पिवळा रंग वापरा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. धनु राशीच्या लोकांचं एखादं दीर्घकाळ प्रलंबित काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींकडून व्यवसायाशी संबंधित काही मदत घेऊ शकता, त्यांच्या मदतीने तुम्ही व्यवसायात काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्याल, तुमचं सांसारिक सुखही वाढेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमच्यावरचं कर्जही हळूहळू कमी होईल. मुलांच्या कोणत्याही परीक्षेच्या निकालामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल.
उपाय : कुटुंबात सुख-समृद्धीसाठी आणि धन-प्राप्तीसाठी लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :