एक्स्प्लोर

Astrology : आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींच्या संपत्तीत होणार वाढ, राशीनुसार करा 'हे' अचूक उपाय

Panchang 16 March 2024 : आज, म्हणजेच 16 मार्च रोजी प्रीती योग, आयुष्मान योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस वृषभसह इतर 5 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच, शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे, त्यामुळे आज या 5 राशींवर शनिदेवाची कृपा राहील.

Astrology Today 16 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, शनिवार, 16 मार्चला शनि आणि चंद्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात असणार आहेत, त्यामुळे आज शनि चंद्र चतुर्थ दशम योग तयार होत आहे. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी चतुर्थ दशम योगासह प्रीति योग, आयुष्मान योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे, त्यामुळे आजच्या  दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुमच्यात नवीन गोष्टी करण्याची उत्सुकताही वाढेल. भावांच्या मदतीने तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता, घर भाड्याने देऊन तुम्हाला चांगला नफा मिळण्याचीही शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाने दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करणं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आज तुमचं कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांची मदत लाभल्याने ऑफिसमधील ताण संपेल. करिअरमध्ये प्रगती होईल.

उपाय : अडथळे दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी टाकून चारमुखी दिवा लावा. तसेच शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करत राहा .

सिंह रास (Leo)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा मान-सन्मान वाढल्याने तुमचं मन प्रसन्न राहील. जर तुम्हाला दुसऱ्याला मदत करण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती नक्कीच कराल. जर तुम्हाला एखादी गाडी किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल तर शनिदेवाच्या कृपेने तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुमची मुलं तुमचा आदर करतील आणि मित्रांसोबत दिवसही चांगला जाईल.

उपाय : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी एका भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात एक नाणं टाका आणि त्यात तुमचे प्रतिबिंब पाहा. त्यानंतर ते तेल एखाद्या गरिबाला दान करा किंवा एका वाटीत शनिदेवाच्या मंदिरात ठेवा.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज सर्व क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील. आज तुम्ही एखाद्या प्रचलित व्यक्तीला भेटू शकता. आज शनिदेवाच्या कृपेने तुम्ही संपत्तीत वाढ करण्याचा प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकेल. तुम्ही घराच्या स्वच्छतेवर पूर्ण लक्ष द्याल आणि नुतनीकरणासाठी काही पैसेही खर्च करू शकता. व्यावसायिकांना आज नफा मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील आणि जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. तुमचे कोणाशी काही मतभेद असतील तर ते आज सोडवले जातील.

उपाय : आर्थिक प्रगतीसाठी शनिवारी काळे कपडे, लोखंडी भांडी, उडीद डाळ, घोंगडी इत्यादी दान करा.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज मकर राशीचे लोक काही धाडसी पाऊल उचलू शकतात. घराबाहेरील लोक तुमच्या बोलण्यावर आणि वागण्याने खूश होतील. आज तुमची मुलं तुमच्याकडे काही विनंती करू शकतात. नोकरदार लोकांना आज एखाद्या मित्राच्या मदतीने दुसऱ्या नोकरीसाठी ऑफर मिळू शकते. व्यवसायात तुमची प्रगती होईल. आज तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांतून उत्पन्न मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्यावरचं कर्जही कमी होईल. नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

उपाय : कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धीसाठी शनिवारी शनि यंत्राची स्थापना करा आणि शनि चालिसाचा पाठ करून गरीब आणि गरजू लोकांना मदत करा.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज काही नवीन कामात हात आजमावण्याची संधी मिळेल आणि त्यात यशही मिळेल. आज तुम्हाला काही जंगी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या पूर्वजांची संपत्ती तुम्हाला मिळू शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या नात्यात प्रेम वाढेल, तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यवसायात आज तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील.

उपाय : मानसिक शांतीसाठी दर शनिवारी पीठ, काळे तीळ आणि साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. तसेच, मोहरीच्या तेलापासून बनवलेल्या वस्तू गरीब आणि गरजूंना खायला द्या आणि त्यांची सेवा करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीत बुध-गुरुची युती; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, प्रगतीसह धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget