एक्स्प्लोर

Astrology : आज वृद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; वृश्चिकसह 5 राशींना होणार डबल लाभ, उत्पन्नाच्या अन्य मार्गातून पैसे येणार

Panchang 15 October 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, ऐन मंगळवारी वृद्धी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 15 October 2024 : आज मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी कुंभ राशीनंतर चंद्र मीन राशीत जाणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला भौम प्रदोष व्रत केलं जाणार आहे. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन उत्साह आणेल. वृषभ राशीचे लोक आपली अपूर्ण कामं एक एक करून पूर्ण करतील आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णयही घेतील. नोकरदार वर्गाला अपेक्षित कंपनीकडून नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते, यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि पगारात चांगली वाढ दिसेल. व्यवसाय करणारे आज काही सकारात्मक बदल करतील, ज्यामुळे विक्रीत वाढ होईल. आज चतुर्दशी तिथीला कुटुंबात श्राद्ध केलं जाऊ शकतं, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य नक्कीच हातभार लावतील. चांगल्या कौटुंबिक वातावरणामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल, संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याची संधी मिळेल.

सिंह रास (Leo)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. सिंह राशीच्या लोकांना आज बाप्पाच्या कृपेने सर्व शत्रू आणि संकटांपासून मुक्ती मिळेल. पैसे कमवण्याचे नवे मार्ग शोधून काढल्याने तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुम्ही चांगली बचत देखील करू शकाल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर आजचा दिवस अनुकूल असेल, आज तुम्ही नात्याला एक पाऊल पुढे नेऊ शकता. व्यवसाय आणि दुकानदारी करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. जर तुम्हाला एखादी गाडी किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तुम्ही या दिशेने पावलं उचलू शकता, ज्यामध्ये घरातील सर्वांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. 

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आजचा दिवस खूप फायद्याचा असणार आहे. आज तुमचं घरातील वातावरण आनंददायी राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंधही चांगले राहतील आणि तुम्ही मिळून एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक देखील करू शकता, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. आज कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग देखील करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुम्ही संध्याकाळ एखाद्या धार्मिक ठिकाणी घालवाल.

वृश्चिक रास (Scorpio)

आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज इतरांच्या मदतीला धावून जातील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असेल आणि तुमच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळे सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. तुमची जी कामं खूप दिवसांपासून अपूर्ण राहिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला वेळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्ही वेळेवर काम पूर्ण कराल आणि कामावर वातावरणही चांगलं राहील. कुटुंबात काही कलह सुरू असेल तर आज ते चर्चेतून सोडवले जातील. भावा-बहिणींमध्ये चांगले संबंध राहतील आणि त्यांचा सल्लाही तुम्हाला उपयोगी पडेल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मकर राशीचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपूर्ण दिवस हसतखेळत घालवतील. तुमच्या मुलाच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला आज थोडे कष्ट करावे लागतील, पण त्यात तुम्हाला यशही मिळेल. आज तुम्हाला बाप्पाच्या कृपेने अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या योजना पुढे नेण्यास सक्षम असाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठीही चांगला असेल. आज तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 15 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget