(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology Panchang 12 October 2024 : विजयादशमीच्या मुहूर्तावर जुळून आला रवि योगाचा शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश
Astrology Panchang 12 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astrology Panchang 12 October 2024 : आज 12 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच शनिवार. आज अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. तसेच, आज दसरा (Dussehra) आणि विजयादशमीचा शुभ दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आजच्या दिवशी रवि योग (Yog), सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रावण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस अधिक खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आजच्या दिवशी देवीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. तसेच, जर तुम्हाला फिरायला जायचं असल्यास आजचा दिवस शुभ आहे. परदेशात जाण्याचे देखील संकेत आहेत. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तुमच्या कुटुंबात वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक असेल. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कामाला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराच्या सहकार्याने तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरु करु शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
दसऱ्याचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी शुभकारक असणार आहे. देवीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांबरोबर चांगला वेळ जाईल. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. तुमचे वैवाहिक नाते मजबूत असल्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारची चिंता सतावणार नाही. संध्याकाळी जवळच्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी जर तुम्हाला कोणती गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
विजयादशमीचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. आज देवाच्या कृपेने तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी, वाहन किंवा सोनं खरेदी करायचं असल्यास आजचा दिवस फार चांगला आहे. पैशांची गुंतवणूकही तुम्ही करु शकता. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: