Astrology : आज श्रावणी सोमवारच्या दिवशी बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींचं भाग्य उजळणार, अनपेक्षित धनलाभाचे संकेत
Panchang 05 August 2024 : आज श्रावणी सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मेषसह 5 राशींवर आज महादेवाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Astrology : आज श्रावणी सोमवारच्या दिवशी बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींचं भाग्य उजळणार, अनपेक्षित धनलाभाचे संकेत Astrology Panchang 05 August Shravan 2024 shravani somvar shubh yog rashi parivartan yog formed today are very auspicious for these zodiac signs horoscope today aries leo capricorn are lucky zodiacs Astrology : आज श्रावणी सोमवारच्या दिवशी बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींचं भाग्य उजळणार, अनपेक्षित धनलाभाचे संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/05/c5a8d4d907791cb2e099a03953e7327c1722824885813713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Astrology 05 August 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आज श्रावणी सोमवारचा दिवस विशेष आहे. आज 5 ऑगस्टला श्रावणाचा पहिला सोमवार असून या दिवशी चंद्र सिंह राशीत जाणार आहे. आज सूर्य चंद्राच्या कर्क राशीत असेल आणि चंद्र सूर्याच्या सिंह राशीत असेल, ज्यामुळे आज 'राशी परिवर्तन योग' देखील तयार होत आहे. याशिवाय आज व्यतिपात योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्यानं आजचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
भोलेनाथांच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मेष राशीचे लोक आज श्रावणी सोमवारमुळे काही विशेष धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतील. नोकरदार लोकांच्या कारकिर्दीसंबंधीची अनिश्चितता आज दूर होईल आणि त्यांना इतर एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकेल. व्यावसायिक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देऊ शकतील आणि चांगला नफा कमावतील. तुमची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं आज हळूहळू पूर्ण होताना दिसतील. तुम्हाला सरकारी योजनांचा लाभही मिळू शकेल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी शिवशंकराच्या कृपेने खूप छान असेल. सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर आज उच्चस्थानी पोहोचण्यात यशस्वी होतील आणि श्रावणी सोमवार असल्याने ते धार्मिक कार्यात सहभागी होतील. ज्या कामावर तुम्ही बराच काळ काम करत आहात त्या कामात आज तुम्हाला यश मिळेल असं दिसतं. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि पैसा वाचवता येईल. ज्यांना गुंतवणूक करायची आहे अशा लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. आज तुम्ही जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवताना दिसाल.
धनु रास (Sagittarius)
जटाधारी महेशाच्या आशीर्वादाने धनु राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच ५ ऑगस्टचा दिवस उत्साहाचा असेल. आज धनु राशीच्या लोकांची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होईल आणि तुमचं आरोग्य देखील सुधारेल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुम्ही जे बोलाल ते लोकांना आवडेल. व्यवसायात असणारे आज एखाद्या ओळखीतून नफा मिळवण्याच्या स्थितीत आहेत. नोकरदार लोक आज सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवतील आणि त्यांचं काम वेळेवर पूर्ण करून चांगल्या मूडमध्ये राहतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा चांगला असेल. मकर राशीचे लोक आज आपल्या मुलांची प्रगती पाहून आनंदी होतील आणि तुमच्या कुटुंबातील वातावरण देखील आज शांत राहील. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच पुढे जा. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुम्ही तुमचा व्यवसाय शिखरावर घेऊन जाल आणि चांगला नफा मिळवू शकाल. नोकरदार लोकांना आज प्रत्येक पावलावर सहकाऱ्यांची साथ मिळेल आणि त्यांचा नवीन नोकरीचा शोधही पूर्ण होईल. घराच आनंदाचं वातावरण राहील.
मीन रास (Pisces)
महादेवाच्या कृपेने मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. मीन राशीचे लोक नातेवाईकांच्या मदतीने प्रदीर्घ प्रलंबित कामं आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि जुन्या गुंतवणुकीतून त्यांना चांगला परतावाही मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जवळच्या मित्राच्या मदतीने तुम्ही तुमचं बिघडलेलं काम दुरुस्त करू शकाल. आज अचानक तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लहान सदस्यांसोबत संध्याकाळचा वेळ चांगला जाईल आणि मानसिक शांती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)