(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज साध्य योगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Panchang 04 September 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी साध्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 04 September 2024 : आज बुधवार, 4 सप्टेंबर रोजी, चंद्र कन्या राशीत जाणार आहे, ज्यामुळे चंद्र आणि गुरु दुसऱ्या, नवव्या आणि पाचव्या घरात उपस्थित राहणार आहेत, यामुळे गुरु चंद्र नवम पंचम योग होत आहे. तसेच आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी नवम पंचम योगासह साध्य योग, शुभ योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घ्या, तो मनापासून आणि मनाने विचार करून घ्या, तरच भविष्यात त्याचा फायदा होईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमची नेतृत्व क्षमता विकसित होईल आणि तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही तुमचं काम इतरांकडून सहज करून घेऊ शकाल. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर मित्रांच्या मदतीने ते आज परत येऊ शकतात. रविवारच्या सुट्टीमुळे आज व्यावसायिकांना सरासरीपेक्षा जास्त नफा होईल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कर्क राशीचे लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात नशिबाच्या साथीने आज चांगलं यश मिळवू शकतील. आज नोकरदारांना सहकाऱ्यांची मदत लाभेल. त्याच वेळी, व्यावसायिक हे बुद्धिमत्तेचा वापर करून चांगला नफा कमवू शकतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या राशीचे विद्यार्थी आज आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. संध्याकाळी तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपल्या बोलण्यातून इतरांना प्रभावित करतील आणि त्यांच्या सभोवतालचं वातावरण आनंदी ठेवतील. तसेच आज तुम्ही अनेक अपूर्ण कामं पूर्ण कराल. शनिदेवाच्या कृपेने आज गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चांगले रिटर्न्स मिळतील आणि त्यांची कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होईल. व्यावसायिकांना मोठा नफा कमवण्याची संधी मिळेल. तुमचा तुमच्या शेजाऱ्यांसोबत चांगला वेळ जाईल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल आणि कोणाकडून तरी अडकलेले पैसे मिळतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळेल. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कल्पनांचंही कौतुक होईल. मोठ्यांच्या सल्ल्याने आणि आशीर्वादाने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. सूर्य देवाच्या कृपेने आज तुमचं बोलणं खूप प्रभावी असेल, ज्यामुळे इतर लोक तुमच्यावर लवकरच प्रभावित होतील. नशिबाने तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिल्याने तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी दिसतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :