एक्स्प्लोर

Astrology Panchang 03 October 2024 : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; धनुसह 'या' 5 राशींवर असेल देवीचा आशीर्वाद

Astrology Panchang 03 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार,  आजच्या दिवसाचा शुभ परिणाम 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींची धार्मिक कार्यात रुची वाढेल तसेच अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.

Astrology Panchang 03 October 2024 : आज 3 ऑक्टोबरचा दिवस हा खास असणार आहे. कारण आजापसून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2024) सुरुवात झाली आहे. तसेच, आज अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी आहे. आजच्या दिवशी दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. तसेच, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी इंद्र योग (Yog), बुधादित्य योग आणि हस्त नक्षत्र योग असे शुभ संयोग जुळून आले आहेत त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार,  आजच्या दिवसाचा शुभ परिणाम 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींची धार्मिक कार्यात रुची वाढेल तसेच अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. तसेच, सर्वांचीच मनं प्रसन्न असतील. आज तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी देखील प्रसन्न वातावरण असेल. तुमच्यावर कामाचा ताण जास्त नसणार. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. देवी दुर्गेच्या कृपेने तुमच्या सर्व चिंता दूर होतील. तुम्हाला आज एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या घरात देखील सकारात्मक वातावरण असेल. तुमच्या तब्येतीचा तुमच्या कामावर चांगला परिणाम दिसेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस फार चांगला जाणार आहे. तुम्हाला पदोपदी नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. संध्याकाळच्या वेळी कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्यावर काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या घरात आज धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. देवीच्या कृपेने तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत खुले होतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत झालेली दिसेल. तसेच, विद्यार्थ्यांचं अभ्यासात चांगलं मन रमेल. तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

हे ही वाचा :

Shardiya Navratri 2024 : आजपासून नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 April 2026: आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
Numerology : 'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?
'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?
Numerology: 25 वयात संघर्ष, पण 35 उलटताच नशीब थेट श्रीमंतीकडे नेतं! 'या' जन्मतारखांवर शनिदेवांचं प्रचंड प्रेम, यश पाहून शत्रूही थक्क, अंकशास्त्र
25 वयात संघर्ष, पण 35 उलटताच नशीब थेट श्रीमंतीकडे नेतं! 'या' जन्मतारखांवर शनिदेवांचं प्रचंड प्रेम, यश पाहून शत्रूही थक्क, अंकशास्त्र

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget