Astrology : आज इंद्र योगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 5 राशींच्या धनात होणार वाढ, बँक बॅलन्स वाढणार
Panchang 02 October 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी इंद्र योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 02 October 2024 : आज बुधवार, 2 ऑक्टोबर रोजी चंद्र कन्या राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी श्राद्ध विधी आणि तर्पण करून पितरांना निरोप दिला जातो.
आज सर्वपित्री अमावस्या श्राद्धाच्या दिवशी ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा म्हणजेच, सर्वपित्री अमावस्येचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज अमावस्या तिथीला श्राद्ध केलं जाऊ शकतं, ज्यात घरातील सर्व सदस्य उपस्थित राहतील. तसेच आज तुम्ही काही मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. आज तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबासाठी ऑनलाइन शॉपिंग करण्याची संधी मिळेल. भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर आज हा निर्णय घेता येईल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच सर्वपित्री अमावस्येचा दिवस खूप छान असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने चांगलं आरोग्य लाभेल. आज काहीतरी मोठं करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही असेल. आज अमावस्या तिथीला कुटुंबात श्राद्ध केलं जाईल, ज्यामध्ये तुम्हीही योगदान द्याल. जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस खूप शुभ असेल, तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामं पूर्ण होतील. आज व्यावसायिकांना अशा बातम्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगला नफा मिळेल. नोकरी करणारे लोक आज दिवसभर रिलॅक्स मूडमध्ये राहतील आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा विचारही करतील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच सर्वपित्री अमावस्येचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल, त्यामुळे प्रगतीतील अडथळे दूर होतील आणि तुम्ही ठरवलेली सर्व कामं पूर्ण होतील. आज तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे तुमची मेहनत यशस्वी होईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा असल्याने आर्थिक स्थिती सुधारेल.
मकर रास (Capricorn)
आजचा, म्हणजेच सर्वपित्री अमावस्येचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने आज अचानक पैसे मिळू शकतात, यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल आणि तुम्ही या पैशाची गुंतवणूक देखील करू शकता. आज तुम्ही तुमच्या पालकांसाठी ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि यादीत आवश्यक घरगुती वस्तू देखील समाविष्ट करू शकता. व्यापारी आज नफा मिळवण्यासाठी नवीन योजना बनवतील आणि त्यासाठी तज्ञांचा सल्ला देखील घेतील. जर तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. संध्याकाळी मित्रांना भेटता येईल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा सर्वपित्री अमावस्येचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या घरात आज धार्मिक वातावरण असेल आणि ते आपल्या जोडीदारासोबत नवरात्रीच्या पूजेशी संबंधित गोष्टींची खरेदीही करू शकतात. दिवाळीच्या स्वच्छता आणि सजावटीबाबत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही चर्चा करू शकता. आज तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची योजना करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. जर कुटुंबात काही वाद चालू असेल तर तो आज संपेल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम दिसून येईल. तुमचे तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी काही वाद होत असतील तर आज तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न कराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :