एक्स्प्लोर

Astrology : आज योगिनी एकादशीच्या दिवशी जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार बाप्पाची कृपा, रखडलेली कामंही मार्गी लागणार, पैशाला पैसा लागणार

Panchang 02 July 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. वृषभसह 5 राशींवर आज बाप्पांची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 02 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार आजच्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. आज, मंगळवार, 2 जुलै रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला योगिनी एकादशीचं व्रत पाळलं जातं. योगिनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि कृतिका नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज वृषभ राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल, वाढत्या आर्थिक समस्यांपासूनही आराम मिळेल. छोटा आणि अर्धवेळ व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठीही काळ चांगला आहे. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करतील आणि अधिकारी आणि सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. त्याच वेळी, व्यावसायिक आज अधिक नफा मिळवण्यास सक्षम असतील आणि चांगलं यश मिळवतील. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या पालकांशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा कराल आणि त्यांच्याकडून सल्ला देखील घ्याल. जर आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर, आपल्या जोडीदारासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपल्या प्रयत्नांनी मोठी उंची गाठतील आणि आपली सर्व उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुमची जीवनशैली सुधारेल आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला यशाच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. नोकरदार लोकांना आज प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील, त्यांना इतर कंपनीकडून चांगल्या पगारासह चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. आज कुटुंबात सुख-शांती राहील.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल. मकर राशीचे लोक आज प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास तयार राहतील आणि सर्व कामं धैर्याने पूर्ण करतील. तुम्हाला जमीन, फ्लॅट किंवा इतर कुठेही गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. आज नोकरदार वर्गामध्ये एक नवीन ऊर्जा दिसेल आणि तुमच्या नेतृत्वगुणांचं कौतुक होईल. त्याच वेळी, आज व्यावसायिक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देतील आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतील. अविवाहित लोकांना आज कोणीतरी खास भेटू शकतं, ज्याचा विचार करून त्यांना खूप आनंद होईल. भावांसोबत काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येईल आणि नाती अधिक घट्ट होतील.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळाल्याने ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतील. आज तुमची प्रतिकारशक्ती आणि शारीरिक आरोग्य उत्कृष्ट असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि ते इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर, आज ते त्यांच्या करिअर संदर्भात इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी होतील आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ते वेळेवर काम पूर्ण करू शकतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातंं घट्ट होईल. 

मीन रास (Pisces)

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज हार न मानता मीन राशीचे लोक सतत प्रयत्न करत राहतील आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चांगलं यश मिळवतील. व्यवसायात तेजी येईल, ज्यामुळे आर्थिक लाभाचे सर्व मार्ग खुले होतील आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात मित्रांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे अडचणी कमी होतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध राखण्यात यश मिळेल आणि तुमच्या जोडीदाराची तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ मिळेल. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल आणि धर्मादाय कार्यात काही पैसाही खर्च कराल. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर आज परत येण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 02 July 2024 : आज महिन्याचा दुसरा दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Embed widget