Astrology News : गणपतीच्या उपासनेसाठी बुधवारचा दिवसच का असतो शुभ? जाणून घ्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठीचे 'हे' सोपे उपाय
Astrology News : हिंदू धर्मानुसार, प्रत्येक धर्म हो कोणत्या ना कोणत्या देवी-दैवतांना समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवस हा भगवान श्री गणेशाचा दिवस मानण्यात आला आहे.
Astrology News : गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण त्याआधी आजचा दिवस बुधवार (Wednesday). आपल्या सर्वांनाचा माहीत असे की, बुधवारचा दिवस हा काही शास्त्रानुसार भगवान गणेशाला समर्पित आहे. आजच्या दिवशी गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे, बुध ग्रहाचं राशी परिवर्तन आजच्या दिवशी सिंह राशीत होणार आहे.
हिंदू धर्मानुसार, प्रत्येक धर्म हो कोणत्या ना कोणत्या देवी-दैवतांना समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवस हा भगवान श्री गणेशाचा दिवस मानण्यात आला आहे. बुधवारचा दिवस हा बुद्धी प्राप्तीचा दिवस असतो. सनातन धर्मानुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात भगवान गणेशाच्या पूजेने करावी.
भगवान गणेशाला बुध ग्रहाचा कारक देव मानण्यात आलं आहे. यासाठी बुधवारच्या दिवशी भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने भक्ताला गणेशाचा आशीर्वाद मिळतो. तसेच, तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते.
बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा का करतात?
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने जेव्हा भगवान गणेशाची निर्मिती केली होती तो बुधवारचा दिवस होता. त्यावेळी कैलाश पर्वतावर बुध देवसुद्धा उपस्थित होते. त्यासाठीच बुधवारच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे.
बुधवारच्या दिवशी 'हे' उपाय करा
- बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील.
- या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी, त्यांना शेंदूर लावावा तसेच मोदकाचा नैवेद्यही दाखवावा.
- बुधवारच्या दिवशी गणेश स्त्रोताचा 11 वेळा जप केल्याने तुमच्या आयुष्यात सुख-शांती टिकून राहील.
- तसेच, आजच्या दिवशी गणपतीला घी आणि गुळाचा नैवेद्य दाखवून तो गाईला खाऊ घाला. हा उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.
- गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपतीला 21 दूर्वा अर्पण करा.
- तसेच, आजच्या दिवशी गणेश चालीसाच पाठ करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Budh Gochar 2024 : पुढचे 21 दिवस 'या' 3 राशींना सतर्कतेचा इशारा; आर्थिक तंगीसह आजारपणही देईल त्रास