Astrology : 'या' राशींच्या मुली रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, 'या' सवयीमुळे लोक त्यांच्यापासून राहतात दूर
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींची 'ही' राशी असते, त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो.
![Astrology : 'या' राशींच्या मुली रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, 'या' सवयीमुळे लोक त्यांच्यापासून राहतात दूर Astrology marathi news girls of zodiac are angry relations with husband and friends are bad Astrology : 'या' राशींच्या मुली रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, 'या' सवयीमुळे लोक त्यांच्यापासून राहतात दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/ca25a8927b298272fde412344eeca703_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Astrology : शास्त्रात क्रोध म्हणजेच राग हा मोठा दोष मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींची 'ही' राशी असते, त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो. जेव्हा हे ग्रह शुभ आणि अशुभ असतात, तेव्हा ते त्यानुसार परिणाम देतात. या बातमीत त्या मुलींच्या राशींबाबत बोलणार आहोत. ज्यांच्या नाकावर सदैव राग असतो. या राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
कर्क - या राशीच्या मुली खूप साहसी आणि उत्साही असतात. मात्र त्यांना खूप लवकर राग येतो. त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप चांगले-वाईट बोलतात. त्यांना शांत करणे खूप कठीण होते. ज्या मुलींचे नाव ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो, वे ने सुरू होते, त्यांची राशी कर्क आहे.
सिंह - या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. ते खूप भावनिक आहेत. त्यांना क्षुल्लक गोष्टीचे वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडू शकतात. त्यांना वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या मुलींचे नाव ही, मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे ने सुरू होते, त्यांची राशी सिंह आहे.
धनु - या राशीच्या मुलींचा स्वभावही खूप रागीट असतो. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवते हे त्यांना आवडत नाही. समोरच्या व्यक्तीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर त्यांना खूप राग येतो. ती रागात काहीही बोलते. ज्या मुलींचे नाव ये, यो, भा, भी, भू, धा, फा, धा, भे या अक्षरांनी सुरू होते, त्यांचे चिन्ह धनु असते.
कुंभ - या राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्या प्रत्येक गोष्टीत शहाणपण दाखवतात. त्यांना राग पटकन येत नसला, तरी जेव्हा येतो तेव्हा तो खूप लवकर येतो. त्या रागाने कोणाला सोडत नाही. ती समोरच्या व्यक्तीला इतकं चांगलं-वाईट सांगतात की, त्यांचं नातं तुटण्याची शक्यता असते. ज्या मुलींचे नाव गु, गे, गो, सा, सि, सु, से, सो, दा या अक्षरांनी सुरू होते त्यांची कुंभ राशी असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)