(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : 'या' 3 राशींवर 2 जुलैपर्यंत राहील बुधाची कृपा, पैशांचा पाऊस पडेल, प्रगती होईल, मान-सन्मान वाढेल
Astrology : बुध ग्रह हा व्यवसाय आणि आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रभावामुळे 3 राशींना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
Astrology : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. पण बुध ग्रहाला सर्व ग्रहांचा लाडका ग्रह म्हणतात. कारण तो अर्थव्यवस्थेला चालना देतो. तसेच बुध हा व्यवसाय आणि आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानला जातो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे 3 राशींना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांना पैसा मिळेल. शेअर बाजार, व्यवसाय आणि व्यापारात बुध ग्रहाच्या हालचालीमुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
2 जुलैपर्यंत वृषभ राशीत
बुध 2 जुलैपर्यंत वृषभ राशीत राहील आणि त्याचा प्रभाव अनेक राशींवर दिसेल.
या 3 राशींवर बुध कृपा करेल
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी वृषभ राशीमध्ये बुध ग्रह असणे खूप फायदेशीर आहे. यामुळे त्यांच्या कोणत्याही कामात कोणतीही अडचण किंवा अडथळा येणार नाही. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही कोणत्याही नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. नवीन वाहने आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांना बुधाच्या कृपेने कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून लाभ मिळू शकतो. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील लोकांचे मार्गदर्शन मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळेल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी 2 जुलैपर्यंतचा काळ चांगला आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. कौटुंबिक सहकार्य वाढेल. संतानसुख मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य स्थिर राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...