Astrology: अखेर 'या' 3 राशींचे ग्रहमान बदलले! चंद्र-मंगळ युतीमुळे गोल्डन टाईम सुरू, श्रीमंतीचे योग, बक्कळ पैसा, नोकरीत पगारवाढ..
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, 25 ऑगस्ट 2025 रोजी चंद्र-मंगळाची युती होतेय. या दरम्यान काही राशींवर शुभ परिणाम होतील आणि जीवनात स्थिरता येईल.

Astrology: अनेकदा माणूस मेहनत करूनही त्याला मनासारखं यश मिळत नाही, अशी वेळी त्याचे ग्रहमान चांगले असले की त्याला आपोआप यशाची शिडी मिळत जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, 25 ऑगस्ट 2025 हा दिवस ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे. या दिवशी चंद्र-मंगळाची युती होतेय. या युतीचा 3 राशींवर शुभ परिणाम होतील आणि जीवनात स्थिरता येईल. जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल...
चंद्र-मंगळाच्या युतीचे या 3 राशींवर शुभ परिणाम..
ज्योतिषशास्त्रानुसार 25 ऑगस्ट 2025 रोजी चंद्र कन्या राशीत भ्रमण करत आहे, जिथे मंगळ एक महिन्यापासून उपस्थित आहे. अशात, सोमवारी चंद्र-मंगळ युती झाली आहे, मंगळ 13 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत कन्या राशीत राहील. दरम्यान, अनेक ग्रह कन्या राशीत भ्रमण करतील, ज्यामुळे मंगळ कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करेल. 27 ऑगस्ट 2025 च्या संध्याकाळपर्यंत चंद्र कन्या राशीत राहतील, ज्यामुळे ही युती खंडित होईल. परंतु चंद्र-मंगळाच्या युती दरम्यान काही राशींचे शुभ परिणाम होतील आणि जीवनात स्थिरता येईल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र-मंगळाच्या युतीमुळे, सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचा प्रवास आनंददायी राहील. नवीन भागीदारांकडून नफा होईल आणि व्यवसायाचा विस्तार होईल. तर दुकानदारांचे काम वाढेल. या आठवड्यात अविवाहित लोकांच्या जुन्या मित्राशी असलेल्या संबंधांची चर्चा सुरू होऊ शकते. प्रेम जीवनात येणाऱ्या समस्या संपतील आणि लवकरच तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. पालकांना त्यांच्या मुलांवर अभिमान बाळगण्याची संधी मिळेल.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि मंगळाची युती या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली ऑफर मिळेल. त्याचबरोबर व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात यश मिळेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि परीक्षेत पूर्वीपेक्षा चांगले गुण मिळवतील. ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांत वृद्धांचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. याशिवाय नातवंडांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार,चंद्राची मंगळाशी भेट या राशीच्या लोकांसाठी चांगली राहील. विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत चांगल्या सवयींचा समावेश करतील. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेलच, पण थकवा आणि अशक्तपणाची समस्याही राहणार नाही. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिकांना मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या मदतीने तरुण स्वतःचे काम सुरू करू शकतात. विवाहित लोकांच्या कुंडलीत एकट्याने लांब प्रवासाला जाण्याची शक्यता असते.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: आजची हरतालिका तृतीया 'या' 4 राशींना पावणार! 4 शुभ योग बनतायत, देवी लक्ष्मीची कृपा, कोट्याधीश होण्याचे संकेत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















