(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज हर्षण योग, लक्ष्मी नारायण योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 3 राशींना मिळणार लाभच लाभ, अडकलेली कामं लागणार मार्गी
Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस आज जुळून आलेल्या शुभ योगाचा 4 राशींना लाभ होणार आहे. या काळात तुमच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ होणार आहे.
Astrology : आज ऑगस्ट महिन्यातला पहिला दिवस गुरुवार. आजचा दिवस अनेक अर्थांनी खास असणार आहे. आज चंद्र बुध ग्रहाची राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. आज हर्षण योग (Yog), लक्ष्मी नारायण योग आणि मृगशिरा नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आले आहेत. यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस आज जुळून आलेल्या शुभ योगाचा 4 राशींना (Zodiac Signs) लाभ होणार आहे. या काळात तुमच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ होणार आहे. तसेच, ग्रहांची स्थिती मजबूत असल्या कारणाने बगवान विष्णुची तुमच्यावर सदैव कृपा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
ऑगस्टचा पहिला दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. तसेच, जे युवक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. जर तुम्ही आरोग्या संबंधित पिडीत असाल तर तुमच्या आजारात हळूहळू सुधारणा होईल. नोकरदार वर्गातील लोकांना करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला धन-प्राप्तीसाठी चांगला योग जुळून येणार आहे. तुमच्या सुख-समृद्धीत दिवसेंदिवस वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. जोडीदाराच्या सहकार्याने तुमची सगळी कामं सहज पूर्ण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यातला पहिला दिवस फार लाभदायक असणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीला यश येऊन येऊन तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. दिवसेंदिवस तुमच्या प्रगतीत चांगली वाढ होईल. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापाराच्या दृष्टीने तुम्हाला अनेक मोठ्या ऑफर्स मिळतील. जोडीदाराबरोबर तुमचा चांगला बॉन्ड दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: