Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' उपाय, जीवनातील सर्व समस्या दूर होतील!
Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीचा सण रविवार, 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. मान्यतेनुसार या दिवशी काही ज्योतिषी उपाय केल्यास सर्व समस्या दूर होतात
Makar Sankranti 2023 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात. हिंदू धर्मात मकर संक्रांतीपासूनच विविध शुभ कार्यांसाठी शुभ काळ सुरू होतो.
स्नान, दान आणि अर्घ्य देण्याची प्रथा
मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि सुर्यदेवाला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर सकाळी सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण केले जाते. यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' उपाय
मानवी शरीर हे आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी या पाच घटकांनी बनलेले आहे. त्यापैकी पाण्याच्या घटकाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. पाणी हे जीवन आहे असे म्हटले आहे. पृथ्वीवरील जीवनही पाण्यामुळेच आहे. असे काही उपाय ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत, जे मकर संक्रांतीच्या दिवशी केल्यास पुण्य मिळते.
मकर संक्रांती 2023 शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.21 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला उदया तिथी येत आहे. त्यामुळे नवीन वर्षात 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे.
मकर संक्रांत 2023 ला हे ज्योतिषीय उपाय करा
-मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करा. असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते.
-जेवताना उजव्या हाताला पाण्याचा ग्लास ठेवा. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते.
-मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे म्हणतात.
-झाडांना जल अर्पण केल्याने सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
-मकर संक्रांतीच्या दिवशी रोज घरामध्ये तुळशीला जल अर्पण करावे. यामुळे व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो.
-सकाळी आंघोळीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातला पहिलाच सण म्हणजे 'मकरसंक्रांत'; वाचा या दिनाचं पारंपरिक महत्त्व