Astro Tips : जेवताना अन्नाला नजर लागते का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात नेमकं काय म्हटलंय...
Astro Tips : अनेकदा आपण जेवायला बसल्यावर अनेक बुभूक्षित लोकांची नजर आपल्या अन्नावर पडते.
Astro Tips : तू किती खाते, पण तुझ्या अंगाला अन्न (Food) का लागत नाही? तू किती बारीक आहेस काही जेवतेस की नाही? तू इतकं खाते पण जातं कुठे? असे आणि यांसारखे असे अनेक प्रश्न घरच्यांकडून, मित्र-मंडळींकडून किंवा समाजातील लोकांकडून सतत आपल्याला ऐकायला मिळतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, यामध्ये फक्त अन्न शरीराला न लागणं महत्त्वाचं नसून शरीराला अन्न का लागत नाही हे जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे.
अनेकदा या संदर्भातील समस्या आपल्याला समजत नाही. पण, याच संदर्भात फलज्योतिषी-पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते असं म्हणतात की, अनेकदा आपण जेवायला बसल्यावर अनेक बुभूक्षित लोकांची नजर आपल्या अन्नावर पडते. काही वेळेला दृष्य-अदृष्य शक्तींची नजर पडते, प्राणी पशु-पक्ष्यांचीसुद्धा नजर पडत असते. तर, काही संवेदनशील व्यक्तींना अशा दूषित दृष्टीच्या अन्नाचा फार त्रास होतो. म्हणजे हे अन्न खाल्ल्याने काही व्यक्तींना त्रास होतो. पण हे असं का होतं या संदर्भात नेमकं कारण आपल्याला माहीत नसतं.
यासाठी आयुर्वेदाच्या दृष्टीने ग्रंथांमध्ये विशेष मंत्र सांगण्यात आला आहे. याचाच अर्थ पंचांगकर्ते गौरव देशपांडे सांगतात की, अन्नाला जर दृष्ट लागत असेल तर ती येऊ नये, त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या आधी म्हणजेच जेवणाच्या आधी एका मंत्राचा जप करायचा आहे.
हा मंत्र खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.
अंजनीगर्भ संभूतं कुमां ब्रम्हचारिणं
दृष्टिदोष विनाशाय हनुमंतं स्मराम्यहं
असा हा मारुतीचा मंत्र म्हणून त्यानंतर अन्न ग्रहणकरावं. याने दूषित अन्न म्हणजेच दृष्टिदोषाने दूषित झालेलं अन्न त्याचा दोष आपल्याला लागत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Shani Dev : 'या' राशींच्या लोकांची होणार डबल दिवाळी, नोव्हेंबरपासून शनी देणार चिक्कार पैसा आणि अपार सुख-समृ्द्धी
Kalki Jayanti 2024 : आज कल्की जयंती! शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या पूजा, विधी आणि तिथी