(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aquarius weekly Horoscope 8 To 14 April 2024 : नवीन आठवडा कुंभ राशीसाठी फलदायी; मिळणार 'ही' चांगली बातमी, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Aquarius Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : नवीन आठवड्यात कुंभ राशीची आर्थिक स्थिती चांगली असेल. ब्रेकअप झालेल्यांनाही या काळात दिलासा मिळेल आणि एखादी चांगली गोष्ट तुमच्यासोबत घडेल.
Aquarius Weekly Horoscope 8th To 14th April 2024 : राशीभविष्यानुसार, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. तुमचं लव्ह लाईफ बहरलेलं असेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Life Horoscope)
ज्यांचा नुकताच ब्रेकअप झाला आहे ते पुन्हा प्रेमात पडतील आणि खुश राहतील. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. कोणतेही निर्णय जोडीदारावर लादू नका. जोडीदारची काळजी घ्या. नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.नात्याला वेळ द्या. तुमच्या आधीच्या प्रियकराला भेटू नका, अन्यथा सुरू असलेल्या नात्यावर त्याचे परिणाम होतील. कोणतेही नाते विश्वासावर टिकते, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)
नवीन आठवड्यात नोकरीत तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील, त्यामुळे कामासाठी सज्ज राहा. आठवड्याच्या सुरुवातील कामात काही समस्या जाणवतील. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक या आठवड्यात चांगला नफा कमवतील, तुम्ही एखादा नवीन जोड व्यवसाय देखील सुरू करू शकता. परदेशातील क्लायंट हाताळताना तुमचे संवाद कौशल्य उपयोगी पडेल. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.
कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)
तुमचं आयुष्य या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. पैशाची आवक वाढेल. तुम्ही सोनं, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता. तुमच्या जीवनात समृद्धी येईल, म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता. तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात.
कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Health Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही कुंभ राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या, घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :