(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aquarius Horoscope Today 09 February 2023: कुंभ राशीचा आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, अविवाहितांना मिळेल चांगली बातमी
Aquarius Horoscope Today 09 February 2023: कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ, जे अविवाहित आहेत, त्यांना चांगले स्थळ येऊ शकते. आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Aquarius Horoscope Today 09 February 2023: कुंभ राशीचे आजचे राशीभविष्य, 09 फेब्रुवारी 2023: आज ग्रहांची स्थिती पाहता धनाच्या बाबतीत गुरुवारचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. नक्षत्रांच्या स्थितीनुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. आज जे अविवाहित आहेत, त्यांना चांगले स्थळ येऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील?
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल सांगत आहे की, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप चांगला जाणार आहे. आज व्यापारी वर्गातील लोक एखाद्या नवीन कामासाठी खूप उत्साही असणार आहेत. आज तुम्ही आर्थिक बाबतीत जे काही प्रयत्न कराल, त्या सर्वांमध्ये तुम्हाला पूर्ण यश मिळेल. आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा, अन्यथा तुम्हाला मानसिक त्रास होईल. आज जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही व्यावसायिक कामात यश मिळू शकते.
कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन
आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात एखाद्या विषयावर परस्पर भांडणे होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज विवाहित लोकांना संतती संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
आज कुंभ राशीचे आरोग्य
आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. पण, धुळ आणि मातीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे धुळ असेल तिथले काम टाळा.
आज नशीब 95% तुमच्या बाजूने
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस आहे. आज तुमच्या नात्यात रोमांस आणि प्रेम असेल. एकमेकांसोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. विवाहित लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनातही सुख-समृद्धी येईल. व्यावसायिक आज नवीन कामाबद्दल खूप उत्साही असतील. आर्थिक दिशेने केलेल्या प्रयत्नांनाच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा आणि स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. लाइफ पार्टनरच्या मदतीने कोणतेही व्यावसायिक काम यशस्वी होऊ शकते. भावंडांशी संबंध सुधारतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
कुंभ राशीसाठी आजचे उपाय
नारायण कवच पाठ करा आणि केळीच्या झाडाची पूजा करा.
शुभ रंग: जांभळा
शुभ अंक: 9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या