Anant Chaturdashi 2025: आज अनंत चतुर्दशीला तब्बल 4 शुभ योगांचा महासंगम! बाप्पा 'या' 3 राशींना संकटातून मुक्त करतील, पुढचे दिवस राजासारखे..
Anant Chaturdashi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार आज 6 सप्टेंबरच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 4 शुभ योगांचा उत्तम संयोजन होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात.

Anant Chaturdashi 2025: गणेशोत्सवाचे 10 दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा, सेवा केल्यानंतर आज अखेर तो दिवस आलाच. जेव्हा बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे, आज अनंत चतुर्दशीचा दिवस खूप खास आहे, कारण आज गणपती बाप्पांना थाटामाटात पण जड अंत:करणाने निरोप दिला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार आज 6 सप्टेंबरच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 4 शुभ योगांचा उत्तम संयोजन होत आहे, त्यामुळे आज गणपती बाप्पा जाता जाता त्यांच्या भक्तांवर आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करतील. यामध्ये 3 राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात.
गणेश विसर्जनाच्या दिवशी 4 शुभ योगांचा महासंगम!
ज्योतिषशास्त्रानुसार, आज 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी 4 शुभ योगांचा उत्तम संयोजन होत आहे. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवि योग, सुकर्मा, धननिष्ठा नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र असेल. या शुभ योगांमध्ये गणपती बाप्पांना निरोप दिला जाईल.
शुभ योगांची निर्मिती 3 राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभदायी!
ज्योतिषशास्त्रानुसार, गणेश विसर्जनाच्या दिवशी या शुभ योगांची निर्मिती ३ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. या लोकांना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणत्या भाग्यवान राशींना आशीर्वाद मिळणार आहेत ते जाणून घ्या.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी अनंत चतुर्दशीचा दिवस खूप शुभ राहील. आर्थिक प्रगतीची शक्यता असेल. धर्मात रस वाढेल. व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला वैवाहिक आनंद मिळेल. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठीही हा काळ शुभ राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होत राहील. असे म्हणता येईल की हा काळ काही लोकांसाठी वरदानासारखा भाग्यवान ठरेल. तुम्हाला पद, पैसा, आदर, सर्वकाही मिळेल. वैयक्तिक जीवनही चांगले राहील.
वृश्चिक
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगल्या दिवसांच्या सुरुवातीचा आहे. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला प्रलंबित पैसे मिळतील. नोकरी करणाऱ्या आणि व्यावसायिक दोघांसाठीही हा काळ फायदेशीर आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. तुम्ही पूजा, उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होईल.
हेही वाचा :
Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीपासून 'या' 5 राशींनी निर्धास्त व्हा! बाप्पा जाता जाता प्रिय राशींवर करणार मोठी कृपा, टेन्शन मिटणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















