एक्स्प्लोर

Amarnath Yatra 2024 : अमरनाथच्या गुहेत आजही नांदतेय अमर कबुतरांची जोडी? जाणून घ्या; पौराणिक कथेत नेमका संदर्भ काय?

Amarnath Yatra 2024 : अमरनाथ येथील बाबा बर्फानी यांच्या संबंधित आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक रहस्यमय तसेच पौराणिक कथा आहेत. 

Amarnath Yatra 2024 : जम्मू-काश्मीरमधील सुप्रसिद्ध अशा अमरनाथ धाम यात्रेला (Amarnath Dham Yatra) 29 जून रोजी सुरुवात झाली आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्याशी संबंधित असलेला हा धाम शिव आणि शक्ती अशा दोन्ही गोष्टींचं प्रतीक आहे. अनेक आव्हानं आणि संकटं असूनसुद्धा अमरनाथ यात्रेला दरवर्षी लाखो भक्तांची रीघ लागलेली असते. असं म्हणतात की, सर्वात आधी महर्षि भृगू यांनी अमरनाथ गुहा यात्रा केली होती. 

अमरनाथ येथील बाबा बर्फानी यांच्या संबंधित आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक रहस्यमय तसेच पौराणिक कथा आहेत. 

अमरनाथ कथा आणि कबूतरांचा जोडा

पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार, भगवान शिव हे देवी पार्वतीला अमरत्वाची गोष्ट ऐकविण्यासाठी याच गुहेत घेऊन आले होते. याच दरम्यान देवी पार्वतीला झोप आली. पण, त्या ठिकाणी उभा असलेला कबूतरांचा एक जोडा भगवान शिव यांची गोष्ट ऐकत होता. या दरम्यान तो वारंवार आवाजसुद्धा काढत होता. ज्यामुळे भगवान शिव यांना वाटलं की देवी पार्वती गोष्ट ऐकतायत. 

भगवान शंकर यांची गोष्ट ऐकल्यानंतर कबुतरांनासुद्धा अमरत्व प्राप्त झाले. त्या दिवसापासून ते आता अमरनाथ गुहेचं दर्शन करताना कबुतरं दिसतात. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की, जिथे ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी आहे आणि खाण्या-पिण्याचंही दूरवर कुठे साधन नाही त्या ठिकाणी हे कबूतर कशा प्रकारे राहत असतील.त्यामुळे या ठिकाणी कबुतरांचं दर्शन होणं म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांचं दर्शन होण्याच्या समानच मानलं जातं. 

अमरनाथच्या गुहेचा इतिहास

अमरनाथ गुहेच्या इतिहासात महर्षि कश्यप आणि महर्षि भृगू यांचंदेखील वर्णन करण्यात आलं आहे. कथेच्या मान्यतेनुसार, एकदा पृथ्वीचा स्वर्ग मानला जाणारा काश्मीर जलमग्न झाला आणि मोठ्या नदीत वाहून गेला. जगाच्या कल्याणासाठी ऋषी कश्यप यांनी त्या पाण्याला छोट्या-छोट्या नद्यांच्या माध्यमातून वाहून दिले. त्या दरम्यान ऋषि भृगू हिमालयाच्या यात्रेला निघाले होते. जलस्तर कमी झाल्याने हिमालयाच्या पर्वत श्रृंखलेत सर्वात आधी महर्षि भृगू यांनी अमरनाथची पवित्र गुहा आणि बाबा बर्फानी यांचं शिवलिंग पाहिलं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Mercury Transit 2024 : अवघ्या 7 दिवसांत बुध ग्रहाचं होणार संक्रमण; नोकरी-व्यवसायासाठी उत्तम काळ, तीन राशींना मिळणार चौफेर लाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Numerology: मार्चचा दुसरा आठवडा...'या' जन्मतारखांचं राज्य! आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट, कोणत्या जन्मतारखांनी सावध राहावं? अंकशास्त्र
मार्चचा दुसरा आठवडा...'या' जन्मतारखांचं राज्य! आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट, कोणत्या जन्मतारखांनी सावध राहावं? अंकशास्त्र
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Surya Shani Yuti 2026: पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे
‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
Embed widget