एक्स्प्लोर

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा 'या' 5 गोष्टी; देवी लक्ष्मीची सदैव राहील कृपा, सुख-समृद्धीत होईल भरभराट

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ योग तयार होतात. अनेक शुभकार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं.

Akshaya Tritiya 2025 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) साजरी केली जाते. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ योग तयार होतात. अनेक शुभकार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं. या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते. त्यानुसार आज अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी काही विशेष काम केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 

अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी करा 

1. देवीची विधीवत पूजा करा 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी. लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करावा. पूजेत देवीला गुलाबाचे फूल अर्पण करून खीर अर्पण करावी. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात धन-समृद्धी प्राप्त होते. 

2. पाण्याने भरलेला कलश दान करा 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणं खूप शुभ मानलं जातं. कलशमध्ये थोडे पाणी आणि थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होते. या दिवशी साखर, पंखा आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

3. घराच्या दारावर अशोकाची पाने बांधा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा किंवा अशोकाची पाने बांधावीत. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख-समृद्धी येते. हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे सौभाग्य वाढते.

4. सोने खरेदी करा 

सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही. या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते.

5. वृक्षारोपण करा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी पिंपळ, आंबा, वड, आवळा, जांभूळ, कडुलिंब आणि इतर फळझाडं लावणं उत्तम मानलं जातं. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यापैकी कोणतेही एक रोप लावल्यास पुण्य फळ मिळतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Budh Graha 2024 : बुध ग्रहाचं मीन राशीत संक्रमण! मिथुनसह 'या' 3 राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन'; शिक्षण, नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी होतील उपलब्ध

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Numerology: मार्चचा दुसरा आठवडा...'या' जन्मतारखांचं राज्य! आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट, कोणत्या जन्मतारखांनी सावध राहावं? अंकशास्त्र
मार्चचा दुसरा आठवडा...'या' जन्मतारखांचं राज्य! आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट, कोणत्या जन्मतारखांनी सावध राहावं? अंकशास्त्र
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Surya Shani Yuti 2026: पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे
‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget