Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 'या' 6 अशुभ गोष्टी चुकूनही घरात ठेवू नका; अन्यथा..वर्षानुवर्ष राहील पैशांची चणचण
Akshaya Tritiya 2024 : वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या काही वस्तू नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानल्या जातात. यासाठी या गोष्टी घरातून काढून टाकणं गरजेचं आहे.
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी केल्यास घरात वर्षभर सुख-समृद्धी नांदते असं म्हणतात. अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खरेदी व्यतिरिक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या काही वस्तू नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानल्या जातात. यासाठी या गोष्टी घरातून काढून टाका नाहीतर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट निर्माण करू शकतात. या गोष्टी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
बंद घड्याळ
अनेकदा असं होतं की, आपल्याला आवडत असलेली घड्याळं खराब होऊनही आपण वर्षानुवर्ष घरात कशीच ठेवतो. अशी, घड्याळं घरातच पडून राहतात. याशिवाय कधी-कधी असंही घडतं की आपण ट्रेंडनुसार घड्याळं बदलत राहतो, त्यामुळे जुनी घड्याळं घरात जमा होत राहतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात अशी बंद घड्याळं असतील तर ती घरात ठेवू नका.
अस्वच्छ तसेच फाटलेले कपडे
घरामध्ये कधीही अस्वच्छ तसेच फाटलेले कपडे ठेवू नका. यामुळे घरात आर्थिक संकटही येऊ शकतं. जुने फाटलेले कपडे घरात ठेवल्याने किंवा परिधान केल्याने साडेसाती मागे लागते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो.
कोरडी रोपे
जर तुम्ही घरात सुकलेली रोपं ठेवली तर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. कधीकधी फुलदाण्यांमध्ये ठेवलेली फुले सुकतात किंवा घरातील झाडे सुकायला लागतात. अशा परिस्थितीत ही वाळलेली झाडे लगेच बदलत राहावीत किंवा काढून टाकावीत. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
तुटलेला झाडू
झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे, त्यामुळे दिवाळी आणि धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देखील तुम्हाला घरात सुख-शांती हवी असेल तर तुमच्या घरातील तुटलेला झाडू बाहेर फेकून द्या.
तुटलेली चप्पल
घरात ठेवलेली तुटलेली चप्पल दुर्दैवाला आमंत्रण देऊ शकते. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुटलेली चप्पल घरात ठेवू नका. तुटलेली चप्पल देखील नकारात्मक उर्जेशी संबंधित आहे. तुमच्या घरातील एखादी चप्पल किंवा शूज खराब झाले असतील तर ते लगेच घराबाहेर फेकून द्या.
कचरा किंवा टाकाऊ पदार्थ
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुनी आणि निरुपयोगी वस्तू घरात ठेवू नये. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार नाही. घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि घरात ठेवलेल्या जुन्या लोखंडी, प्लास्टिक, स्टीलच्या वस्तू किंवा जुनी वर्तमानपत्र आत्ताच देऊन टाका. तरच, तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :