Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुळून आले 5 शुभ योग! 'या' राशींवर असणार लक्ष्मीची कृपा, संपत्तीत होणार चिक्कार वाढ
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
Akshaya Tritiya 2024 : आज अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) शुभ दिवस. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता. याचं कारण म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही काम करता त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळते. त्यामुळेच, आजच्या दिवशी सोन्या-चांदीची (Gold) खरेदी करणे, घर-गाडी खरेदी, तसेच लग्न, पूजा, विधी यांसारखे मंगलमय कार्यक्रम केले जातात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच, यावर्षी आजच्याच दिवशी पाच शुभ योग जुळून आले आहेत त्यामुळे या दृष्टीने देखील आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
अक्षय्य तृतीयेला जुळून आले पंचमहायोग!
ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी बुधादित्य योग, गजकेसरी योग, शुक्रादित्य योग, मालव्य योग आणि शश राजयोग जुळून आले आहेत. यामुळेच, आजचा दिवस हा अधिक खास झाला आहे.
'या' राशींसाठी अक्षय्य तृतीया शुभदायी!
मेष रास (Aries Horoscope)
आजच्या दिवशी बुद्धादित्य राजयोग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि षष्ठ योग यांसारखे योग जुळून आल्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुम्हाला अनपेक्षित लाभ होतील. व्यवसाय तुमचा चांगला चालेल. ज्यांचा व्यवसाय परदेशात आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. तुम्हाला लवकरच फायदा होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस जीवनात नवीन सुरुवात होण्याची शक्यता निर्माण करत आहे. प्रत्येक पावलावर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनात सकारात्मकता वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन संधी निर्माण होतील. चांगली संधी हातून जाऊ देऊ नका. तुमचा मान-सन्मान वाढेल. संपत्तीत वाढ होईल. घर आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
अक्षय्य तृतीयेला तयार होणारा पंच महायोग कन्या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकतो. या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ते स्थान प्राप्त करू शकता, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायही चांगला नफा होईल. मालमत्ता खरेदी करता येईल. मालमत्तेतील गुंतवणूक नफा देईल. वैयक्तिक आयुष्यही चांगले राहील. एकंदरीतच, जीवनाच्या प्रत्येक पैलूवर तुम्ही समाधानी दिसाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :