![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Deep Amavasya 2024 : आज आषाढातील 'दीप अमावस्या'; जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत आणि या दिनाचं महत्त्व
Aashadh Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते.
![Deep Amavasya 2024 : आज आषाढातील 'दीप अमावस्या'; जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत आणि या दिनाचं महत्त्व Aashadh Deep Amavasya 2024 know shubh muhurtha puja vidhi and importance of the day marathi news Deep Amavasya 2024 : आज आषाढातील 'दीप अमावस्या'; जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत आणि या दिनाचं महत्त्व](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/02/14a832d6402058410df00958b837761e1722577561453358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aashadh Deep Amavasya 2024 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या (Deep Amavasya) ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण (Shrawan) महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं.
यावर्षी आषाढ अमावस्या आज साजरी केली जाणार आहे. यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.
दीप अमावस्येचं महत्त्व
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते
दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात आजपासून (4 ऑगस्ट) रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. ही अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 03 वाजून 50 मिनिटांनी सुरु झाली तर आज दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी दीप अमावस्या संपन्न होईल.
'अशी' साजरी करा दीप अमावस्या
दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने प्रज्वलित करा. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.
'या' मंत्राचा जप करा
पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :
Shani Dev : शनीची मार्गी चाल 'या' 3 राशींसाठी ठरणार भाग्यवान; दुर्लभ राजयोगामुळे धनवान होण्याची सुवर्णसंधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)