(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनीची मार्गी चाल 'या' 3 राशींसाठी ठरणार भाग्यवान; दुर्लभ राजयोगामुळे धनवान होण्याची सुवर्णसंधी
Shani Dev : शनी तीन महिन्यांसाठी उलटी चाल चालणार आहेत. तर, 15 नोव्हेंबर शनी आपल्या मूळ सरळ चालीत पुन्हा मार्गी होतील. यामुळे कुंभ राशीत शश राजयोग जुळून आला आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता म्हटलं जातं. शनी प्रत्येकाला आपल्या राशीनुसार फळ देतात. शनी (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालवधी घेतात. या दरम्यान शनी वेळोवेळी वक्री आणि मार्गी होतात. कारण या दरम्यान शनी फार शक्तिशाली असतात.
या दरम्यान, शनी तीन महिन्यांसाठी उलटी चाल चालणार आहेत. तर, 15 नोव्हेंबर शनी आपल्या मूळ सरळ चालीत पुन्हा मार्गी होतील. यामुळे कुंभ राशीत शश राजयोग जुळून आला आहे. याचा थेट परिणाम 3 राशींवर होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या सरळ चालीचा कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल फार फायदेशीर ठरणार आहे. या दरम्यान तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या व्यवसायात तसेच नोकरीत तुम्हाला चांगली प्रगती दिसून येईल. या काळात तुमचे विचार फार सकारात्मक असतील. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. आर्थिक बाबतीत तुम्ही फार समृद्ध असाल. नोकरीत प्रमोशनची संधी मिळू शकते. तसेच, तुम्हाला जर नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ फार चांगला आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या ज्या काही समस्या होत्या त्या हळूहळू दूर होताना दिसतील. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. पैसे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: