एक्स्प्लोर

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारली काळी गुढी, अजित पवारांच्या भूमिकेचा विरोध, कर्जमाफीच्या मुद्यावरुन स्वाभिमानी आक्रमक

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कांद्याचा आणि कापसाचा हार घालून काळी गुढी उभारली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Parbhani :  सरकार येण्यापूर्वी कर्जमाफी करु असं आश्वासन महायुतीनं शेतकऱ्यांना दिलं होतं.  आता मात्र, शेतकऱ्यांना कर्ज भरा असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच भूमिकेचा परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कांद्याचा आणि कापसाचा हार घालून काळी गुढी उभारली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून  करण्यात आला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्जमाफीच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. कर्जमाफीच्या आश्वासनाची सरकारनं पूर्तता केली नाही. त्यामुळं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली. 

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.

राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. मात्र, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

31 तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका

व्हिडीओ

Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Ajit Pawar & Satej Patil: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
Pune Election: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
BMC Election 2026: मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
Embed widget