एक्स्प्लोर

Tomato Price : परतीच्या पावसामुळं टोमॅटोची आवक घटली, दरात 10 ते 15 रुपयांची वाढ

पावसामुळं बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. सध्या टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे

Tomato Price : सध्या राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. भाजीपाला पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसानं टोमॅटो (Tomato) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. सध्या टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 35 ते 40 रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

पावसामुळं टोमॅटोचं 50 टक्के उत्पादन घटलं 

एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस सुरु असल्यामुळं टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं टोमॅटोचं 50 टक्के उत्पादन घटलं आहे.  त्यामुळं एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत. मागील आठवड्यात 30 ते 32 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असलेले टोमॅटो आता 35 ते 45 रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळं आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत.

 किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत 

दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांआधी 30 ते 40 रुपये प्रति किलो असलेले टोमॅटोचे दर आज किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागत आहे. पावसामुळं टोमॅटोची आवक घटल्यानं भाववाढ झालीय. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढीलतीन ते चार दिवस पावसाचा ओघ पाहता हा दर चढाच राहिल अशी शक्यता आहे. राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका सर्वचं शेतमालाला बसत आहे. या पावसामुळं शेतमालाचं उत्पादन देखील घटत आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांसह टोमॅटो पिकाला देखईल बसला आहे. त्यामुळं बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून दरांमध्ये वाढ होत आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची एपीएमसी मार्केटमध्ये आवक होत आहे. 

 महत्त्वाच्या बातम्या:

Marathwada Rain : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका, शेतातच झाला सोयाबीनचा चिखल, शेतकरी संकटात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget