Sugarcane : 17 महिने पूर्ण झाले तरी उसाला तोड नाही, वसमत तालुक्यात 2 कारखाने असूनही अतिरीक्त उसाचा प्रश्न
हिंगली जिल्ह्यातही अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर अतिरीक्त ऊस शिल्लक आहे.
Sugarcane News Hingoli : सध्या राज्यात अतिरीक्त उसाच्या गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. हिंगली जिल्ह्यातही अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते. वसमत तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. तरीदेखील यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला आहे.
17 महिने झाले तरी तोड नाही
परस्परांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनो ही परिस्थिती बघा. काहीच दिवसावर खरीप हंगामाची पेरणी आली आहे. परंतु शेतात अजूनही ऊस उभा असल्याचे महिला शेतकरी द्वारकाबाई सवंडकर यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील हापसापूर शिवारात विदारक दृश्य आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. द्वारकाबाई सवंडकर यांच्या पतीचे 8 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर द्वारकाबाई आणि त्यांचा मुलगा दत्तात्रय शेतात काम करुन कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहेत.
माझ्याकडे 2 एकर शेती आहे. त्यापैकी 1 एकर शेतात उसाची लागवड केली होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लागवड केली आहे. आज या उसाला 17 ते 18 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतू अद्यापही या उसाला तोडणी आली नसल्याचे शेतकरी दत्तात्रय सवंडकर यांनी सांगितले. दत्तात्रय सवंडकर यांची पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे नोंदणी आहे. विशेष म्हणजे त्यांचे या कारखान्यात शेयर्स आहेत. त्या या कारखान्याच्या सभासद असूनही तोडणी केली जात नाही. तोडणी करायला आलेल्या कामगारांनी 20 ते 25 हजार रुपये मागितल्याचे सवंडकर यांनी केला.
सदस्य असूनही माझा ऊस कारखान्याने नेला नाही. माझ्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे. ते कर्ज परतफेड करण्यासाठी उसाची लागवड केली होती. पण अद्याप देखील ऊस कारखान्याला गेला नसल्याचे सवंडकर यांनी सांगितले. रोज राजकीय नेते ऐकमेकांवर टीका करतात, सभा घेतात पण शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुले शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची विनंती सवंडकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
- Sugarcane News : अहमदनगरमध्ये अतिरीक्त उसाचा प्रश्न, गाळपाची जबाबदारी 'या' साखर कारखान्यांवर
- Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप