एक्स्प्लोर

Sugarcane workers : अहमदनगर जिल्ह्यात 'अमृत पंधरवाडा' अभियान, ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा परिषदेनं देखील अमृत पंधरवाडा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार आहे.

Sugarcane workers : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त देश पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा परिषदेनं देखील अमृत पंधरवाडा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांची (Sugarcane workers) 100 टक्के नोंदणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे 15 विभाग सहभागी होणार

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेकडून अमृत पंधरवाडा अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदेचे 15 विभाग सहभागी होणार आहे. यातील समाजकल्याण विभाग हा जिल्ह्यातील 100 टक्के ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करणार आहे. तर रोजगार हमी विभाग झेडपीच्या शाळा आणि अंगणवाड्या भोवती जैविक संरक्षक भिंती उभाणार आहे. तर जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील 25 टक्के लोकल फंड, पीआरसी, एजी मुद्दे सादर करणार आहे. आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण करणार आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हर घर जल योजनेत प्रत्येक तालुक्यातून किमान पाच गावात या योजनेचा लाभ देणार आहे. तर कृषी विभाग महाडिबीटीमार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांचे कागदपत्रे 100 टक्के जमा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Sugarcane workers : अहमदनगर जिल्ह्यात 'अमृत पंधरवाडा' अभियान, ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार 

स्वच्छतेच्या जन जागृतीसाठी रथ यात्रेचेही आयोजन

पशूसंवर्धन विभाग 50 पशू आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणार आहे. स्वच्छता विभाग 101 गावे आणि 1 तालुका ओडिएफ प्लस करणार आहे. तसेच गावोगावी स्वच्छतेच्या जन जागृतीसाठी रथ यात्रेचेही आयोजन करणार आहे. ग्रामपंचायत विभाग कामगारांना जेवणाची व्यवस्था करणे, स्थानिक निधी लेखा आक्षेप 25 टक्के निकाली काढणे, एकल महिलांची नोंदणी करणे असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदचा लघू पाटबंधारे विभाग जल शक्ती अभियानात किमान 45 बंधारे बांधून पूर्ण करणार आहे. तर बांधकाम विभाग किमान 100 शाळा, अंगणवाडी इमारतींना रेन वॉटर हॉर्वेस्टींग करणार आहे. जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्राचे अ, ब, क श्रेणी निश्चित करणार आहे. तसेच शुन्य ते सहा वर्षे वयातील सॉम आणि मॅम श्रेणीतील बालकांची आरोग्य तपासणी देखील करणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी प्रत्येक विभागाने घेतलेली जबाबदारी शंभर टक्के पार पाडावी, से आवाहन केले आहे. दिलेली जबाबदारी योग्य पार न पाडल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
Embed widget