Rice Identification: तुम्ही प्लास्टिकचे तांदूळ तर खात नाहीत ना? असा ओळखा खरा आणि खोटा बासमती
Identification of Rice: आपण तांदळाचे काही दाणे हातात घेऊन खरे तांदूळ आणि नकली तांदूळ ओळखू शकणार नाहीत. यासाठी काही पद्धती आहेत ज्यातून आपण याची सत्यता पडताळू शकता.
Identification of Rice: आजकाल तंत्रज्ञानाचा विकास जितका वेगाने होतोय तितक्याच वेगाने त्यांचा गैरवापर होत आहे. याचाच वापर करुन अन्नधान्यांमध्ये देखील भेसळीचं प्रमाण वाढलं आहे. यातून भारताचा बासमती तांदूळ देखील वाचलेला नाही. भारतीय बासमती तांदळाचा खप देशात आणि जगात वाढत आहे. हा खप पूर्ण करण्यासाठी अनेक लोक बनावट प्लास्टिकचे तांदूळ विकत आहेत. हा प्लास्टिकचा तांदूळ हातात घेतल्यावर तो खऱ्या बासमती तांदळासारखा दिसतो. रंगही तोच, सुगंध आणि चव जवळजवळ सारखीच. मात्र हा तांदूळ खाल्ल्यानं अनेक आजार होत आहेत.
आज हा प्लास्टिकचा तांदूळ भेसळ करून विकला जात आहे, ही चिंतेची बाब आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी तांदळाची ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचबाबत आम्ही आज आपल्याला माहिती देणार आहोत. तांदळाचे काही दाणे हातात घेतल्याने तुम्हाला तांदूळ खरा आहे की खोटा हे कळू शकत नाही. त्यासाठी बासमती तांदूळ आणि प्लास्टिक तांदूळ यांची खरी माहिती असणं गरजेचं आहे. आपण घरच्या घरी काही सोप्या प्रक्रिया करून देखील याची सत्यता पडताळू शकता.
बासमती तांदूळ
बासमती तांदूळ म्हणजे खवय्यांचा आवडता प्रकार. या तांदळाला जगभरातून मोठी मागणी आहे. या तांदळाचं पेटंट भारताला मिळालेलं आहे. भारतीय बासमती तांदळाला युरोपियन मार्केटमध्येही प्रचंड मोठी मागणी आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये बासमती तांदूळ पिकवला जातो. हा तांदूळ शिजवल्यानंतर भाताची लांबी दुप्पट होते. हा भात शिजल्यावरही चिकटत नाही, त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
प्लास्टिकचा तांदूळ
जगभरातील बासमती तांदळाची मागणी पूर्ण करण्यासाठी आता प्लास्टिकच्या तांदळाची निर्मिती केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. हा तांदूळ बटाटा, सलगम, प्लास्टिक आणि राळ यापासून बनवला जातो, जो पचायला खूप कठीण असतो. हा तांदूळ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. काही गोष्टींची काळजी घेतल्यास प्लास्टिकचा तांदूळ खरेदी करणे टाळता येऊ शकतं.
चुना मिसळून ओळखा
तुम्ही तुमच्या हाताने तांदूळ जरूर पाहाल, पण तुम्हाला नकली तांदूळ आणि खरा तांदूळ यातील फरकही कळत नाही, कारण दोन्ही तांदूळ सारखेच दिसतात.
ही फसवणूक टाळण्यासाठी तांदळाचे काही नमुने घेऊन एका भांड्यात ठेवा.
यानंतर चुना आणि पाणी मिसळून द्रावण तयार करा.
आता या द्रावणात तांदूळ भिजवून काही वेळ राहू द्या.
काही वेळाने भाताचा रंग बदलला किंवा रंग सुटला तर समजून घ्या की भात नकली आहे.
प्लास्टिकचा तांदूळ आणि अस्सल बासमती तांदूळ यातील फरक ओळखणे खूप सोपे आहे
एका ग्लास पाण्यात एक चमचा कच्चा तांदूळ मिसळा आणि ते विरघळवा. तांदूळ पाण्यावर तरंगत असेल तर समजून घ्या की हा भात नकली आहे, कारण खरा तांदूळ किंवा धान्य पाण्यात टाकताच पाण्यात बुडतो.
एका चमच्यात थोडे तांदूळ घ्या आणि जाळा. तांदूळ जळताना प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल तर समजून घ्या की तांदूळ बनावट आहे.
गरम तेलात टाकूनही तुम्ही नकली तांदूळ ओळखू शकता. यासाठी खूप गरम तेलात तांदळाचे काही दाणे टाका. यानंतर भाताचा आकार बदलला तर सावध व्हा.
खरा बासमती आणि नकली बासमती शिजवूनही ओळखता येतो. यासाठी थोडे तांदूळ उकळून एका बाटलीत 3 दिवस भरून ठेवा. जर तांदळात बुरशी आली तर भात खरा आहे, कारण नकली तांदळाला अशावेळी काहीही होत नाही.
टीप: ही माहिती काही मीडिया रिपोर्ट आणि माहितीवर आधारित आहे. कोणतीही माहिती प्रत्यक्ष अमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )