एक्स्प्लोर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. या मुद्यावरुन आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Rohit Pawar on Onion Prices : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा 2 ते 3 रुपये किलो दरानं विकावा लागत आहे. त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार ? 

कांद्याचे साधारणपणे एकरी 5 ट्रॉली होणारे उत्पादन यंदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दोन तीन ट्रॉलीवर येऊन उत्पादनात निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे. अशी स्थिती असताना “उत्पादन अधिक आहे आणि खरीददार कमी असल्याने कांद्याचे दर कोसळले” या आशयाचे राज्याच्या प्रमुखांचे वक्तव्य शेतकऱ्यांची थट्टा करणारे नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. एवढी असंवेदनशील वक्तव्य करणे योग्य नाहीत. कदाचित या सरकारला संवेदनशील मार्गाची भाषा कळत नसावी. बाहेर देशांमध्ये केंद्रीय नेतृत्वाने इतक्या चकरा मारुनही आपला कांदा बाहेर देशात जात नाही हे केंद्र सरकारच्या धोरणांचे अपयश नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे. याबाबत उद्या सकाळी 9 वाजता लासलगावमध्ये सविस्तर बोलणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही (Onion Price Crisis) निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावे अशा अनेक मागण्याशेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.  

12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु करण्याचा निर्णय

आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, अनेक शेतकरी कांद्याला एक रुपये भाव मिळतो म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगितलं, काही झालं तरी कांदा विकत घ्या, कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त नाही. त्याची खरेदी, साठवणूक करुन तो पुन्हा बाजारात आणायचा, हे सगळं अडचणीचं असतं. पण आपल्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget